स्व. अण्णासाहेब देव स्मृति आंतरशालेय वादविवाद स्पर्धा उत्साहात संपन्न!…..

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला, चिकित्सक विचारांना आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी स्व. अण्णासाहेब देव स्मृति आंतरशालेय वादविवाद स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा व कै. काकासाहेब ठोंबरे स्मृति सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे हे १८ वे वर्ष होते. यावर्षी स्पर्धेसाठी ‘डिजिटल साधनांचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेवर सकारात्मक/नकारात्मक परिणाम करत आहे’ हा

Read more

⚡🔌 विद्यार्थी सुरक्षा समिती व अभियंता दिनानिमित्त विद्युत सुरक्षा जनजागृती! 🔌⚡

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत अभियंता दिन तसेच विद्यार्थी सुरक्षा समितीच्या वतीने विद्युत सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विद्युत सुरक्षेचे महत्त्व समजावे, विद्युत उपकरणांचा सुरक्षित वापर करावा आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता.या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) येथील श्री. संदीप कायंदे, असिस्टंट

Read more

🙏🌺अथर्वशीर्षाचे पंचसहस्त्रावर्तन; बाल शिवाजी शाळेत भक्ती-संस्कारांचा मंगलमय संगम! 🙏🌺

कोला | दि. १५ सप्टेंबर २०२६गणेशोत्सवाचे औचित्य साधून ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत अथर्वशीर्षाचे पंचसहस्त्रावर्तन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि अध्यात्मिक मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने दरवर्षी शाळेत अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण आयोजित केले जाते.🕉️ यावर्षी तब्बल १,००० विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने अथर्वशीर्षाचे ५,००० आवर्तन केले. गणपती बाप्पाच्या चरणी श्रद्धा अर्पण करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वेदपठणाच्या वातावरणामुळे

Read more

इंटरस्कूल मीटमध्ये बाल शिवाजी शाळेचे घवघवीत यश…

विज्ञान, गणित व तंत्रज्ञान स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकावर मोहोर….. कोठारी कॉन्व्हेंटतर्फे आयोजित ब्रिजलाल बियाणी इंटर स्कूल सायन्स, मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी मीटमध्ये “ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली.इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत Action Research Project Presentation on Best Themes and Practical

Read more

बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी सांभाळली शालेय व्यवस्थापनाची धुरा…

“शिक्षकांच्या भूमिकेत गेल्यावरच त्यांच्या कार्याचे खरे महत्त्व कळते” अकोला : “शिक्षकांच्या कार्याप्रति असणारे समर्पण त्यांच्या भूमिकेत गेल्यानंतरच खऱ्या अर्थाने कळते,” या भावनेतून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त केला. निमित्त होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिनाचे! स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा शिक्षण संचालित बाल शिवाजी शाळेत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित

Read more

🌸 बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्साहात साजरी! 🌸

📍 अकोला : ब्राह्मण सभा शिक्षण संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.🪔 श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथी सौ. शीतल समीर थोडगे यांचे स्वागत विद्यार्थिनी नीती सौरभ सारडा हिने गुलाबपुष्प देऊन केले.🎤 कार्यक्रमाचे संचलन इयत्ता तिसरीतील विद्यार्थी स्वरा धीरज गिरी व राजवीर विठ्ठल गोमासे

Read more

संस्कृती जपणुकीचा संदेश देणारा संस्कृतदिन बाल शिवाजी शाळेत उत्साहात संपन्न!

‘संस्कृती धर्म रक्षणाय खलु’ या उक्तीला सार्थ ठरवत भारतीय संस्कृतीतील पावित्र्य, प्रेम व बंधुभाव जपणारा संस्कृत दिन व रक्षाबंधन सोहळा बाल शिवाजी माध्यमिक शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक मा. डॉ. सौ. उत्पला मुळावकर उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर यांनी अतिथींचे स्वागत केले. सौ. किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले.🎶 इयत्ता ८

Read more

बाल शिवाजी शाळेत सखी सावित्री समितीचे पुनर्गठन व समुपदेशन कार्यशाळा उत्साहात!

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे सखी सावित्री समितीचे पुनर्गठन तसेच विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन उत्साहात करण्यात आले.कार्यक्रमात समितीच्या नवनियुक्त सदस्यांची ओळख करून देण्यात आली. समितीच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. वैशाली देशपांडे उपस्थित होत्या. सहसचिव म्हणून माध्यमिक मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे उपस्थित होत्या.👩‍⚕️ समिती सदस्य म्हणून

Read more

कुटुंब प्रबोधनातून सुसंवाद, संस्कार आणि दृढ नात्यांचा संदेश

बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी पालकांच्या उत्स्फूर्त सहभागात ‘कुटुंब प्रबोधन’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच कुटुंबातील सुसंवाद, संस्कार, परस्पर सामंजस्य आणि पालक-पाल्याचे नाते दृढ व्हावे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी श्री. राजेंद्र उमाळे, सौ. वैशाली फडणीस, श्री. प्रकाशजी सोनगावकर व डॉ. राधा पुरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने

Read more

कृषी विद्यापीठातील बायोटेक्नॉलॉजी विभागाची विद्यार्थ्यांनी घेतली ज्ञानवर्धक सफर!

बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक क्षेत्रभेट उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण व्हावी, आधुनिक जैवतंत्रज्ञानाची ओळख व्हावी तसेच प्रत्यक्ष प्रयोगशाळेतील संशोधन कार्याचा अनुभव मिळावा, या उद्देशाने बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची दि. ०५ ऑगस्ट २०२६ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील बायोटेक्नॉलॉजी विभागास शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या

Read more
1 2 3 … 12