शालेय बॉक्सिंग स्पर्धेत वेदश्री गोतमारेची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड!
अकोला : ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळेची इयत्ता 10 वीतील विद्यार्थिनी कु. वेदश्री योगेश गोतमारे हिने बॉक्सिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरावर सुवर्णपदक पटकावले असून, तिची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अकोला आणि जिल्हा
Read more