बाल शिवाजी शाळेची ‘प्लास्टिकमुक्त परिसर’ मोहीम; संकलित प्लास्टिक पुनर्चक्रीकरणासाठी सुपूर्द….

दि. १७ ऑक्टोबर २०२६ : ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ येथील इको क्लबच्या वतीने ‘प्लास्टिकमुक्त परिसर’ या उपक्रमांतर्गत प्लास्टिक संकलन मोहीम उत्साहात राबविण्यात आली. या मोहिमेत विद्यार्थ्यांना आपल्या घरातील तसेच परिसरातील अनावश्यक प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या संकलित करण्याचे आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची जाणीव ठेवत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक संकलित केले. संकलित

Read more

📰 बाल शिवाजी शाळेत विद्यार्थ्यांना सीपीआर प्रशिक्षण! ❤️

अकोला : ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ येथे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने प्रसिद्ध भूलतज्ज्ञ, अतिदक्षता सल्लागार तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. राजेंद्र बाळकृष्ण सोनोने यांनी सीपीआर (CPR – Cardiopulmonary Resuscitation) या जीवनरक्षक प्रथमोपचार पद्धतीविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे सीपीआर देण्याची पद्धत, त्यातील बारकावे, योग्य तंत्र आणि आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची खबरदारी

Read more

🌿💧 जलसंवर्धनाचा संदेश देत बाल शिवाजी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन! 💧🌿 🏆 ‘पाण्याचे नियोजन, जीवनाचे संतुलन’ या विषयावर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग! 🎨✍️

अकोला : विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, पाण्याचे महत्त्व पटावे आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजावी, या उद्देशाने इको क्लब अंतर्गत दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी जलसंवर्धन उपक्रमावर आधारित ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘पाण्याचे नियोजन, जीवनाचे संतुलन’ हा या स्पर्धांचा विषय होता.या उपक्रमांतर्गत इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर

Read more

चिन्मय गीता पठण स्पर्धेत शांभवीचे घवघवीत यश….

आंतरराष्ट्रीय चिन्मय गीता पठण स्पर्धेत शांभवीचे घवघवीत यश! अकोला जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक; राज्यस्तरीय फेरीसाठी निवड…. अकोला : आंतरराष्ट्रीय चिन्मय गीता पठण स्पर्धा २०२६ मध्ये ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेतील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. शांभवी अभिषेक सोनगावकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत अकोला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पटकावले. शांभवीने आपल्या प्रभावी, शुद्ध व आत्मविश्वासपूर्ण गीता पठणातून परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक

Read more

बाल शिवाजी शाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा….

ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. माध्यमिक शालांत परीक्षा २०२६-२७ मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या चि.युगंधर निलेश पाकदुने व चि. अभिनव निलेश सोनी ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री. नरेंद्र देशपांडे यांनी “धनाच्या बळावर, तलवारीच्या धारेवर स्वातंत्र्य मिळवता येत नाही आणि देशाचे भविष्यही उज्वल घडू शकत नाही तर केवळ देशाची

Read more

🏆 अभियांत्रिकी दिनानिमित्त पोस्टर सादरीकरणात बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी! 🏆

🔬💡 विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांना विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची जोड! 💡🔬 अकोला (बाभूळगाव)  अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अकोला. (COETA) तर्फे ‘राष्ट्रीय अभियांत्रिकी दिन’(Engineers’ Day) १५ सप्टेंबर २०२६ निमित्य आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर सादरीकरण (Poster Presentation) स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या १२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेसाठी 🔹 Advances in Science, Engineering and Technology 🔹

Read more

माझी बाल शाळेत’ विविध स्पर्धा संपन्न….

अकोला – “ब्राह्मण सभा संचालित माझी बाल शाळेत स्व. अण्णासाहेब देव स्मृतिप्रीत्यर्थ विविध स्पर्धाचे आयोजन २६ व २७ सप्टेंबर रोजी केले होते. यंदा या स्पर्धेचे २९ वे वर्षे होते. या स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. यामध्ये अ व ब तसेच क या गटांचा समावेश असतो. अ व ब गटात अनुक्रमे स्मरणशक्ती, चित्रकला, संस्कृत, पाठांतर, मराठी कविता, व इंग्रजी कविता, वेशभूषा

Read more

स्व. अण्णासाहेब देव स्मृति आंतरशालेय वादविवाद स्पर्धा उत्साहात संपन्न!…..

विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वकौशल्याला, चिकित्सक विचारांना आणि अभिव्यक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी स्व. अण्णासाहेब देव स्मृति आंतरशालेय वादविवाद स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा व कै. काकासाहेब ठोंबरे स्मृति सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे हे १८ वे वर्ष होते. यावर्षी स्पर्धेसाठी ‘डिजिटल साधनांचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेवर सकारात्मक/नकारात्मक परिणाम करत आहे’ हा

Read more

🙏🌺अथर्वशीर्षाचे पंचसहस्त्रावर्तन; बाल शिवाजी शाळेत भक्ती-संस्कारांचा मंगलमय संगम! 🙏🌺

कोला | दि. १५ सप्टेंबर २०२६गणेशोत्सवाचे औचित्य साधून ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत अथर्वशीर्षाचे पंचसहस्त्रावर्तन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि अध्यात्मिक मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने दरवर्षी शाळेत अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण आयोजित केले जाते.🕉️ यावर्षी तब्बल १,००० विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने अथर्वशीर्षाचे ५,००० आवर्तन केले. गणपती बाप्पाच्या चरणी श्रद्धा अर्पण करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वेदपठणाच्या वातावरणामुळे

Read more

बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी सांभाळली शालेय व्यवस्थापनाची धुरा…

“शिक्षकांच्या भूमिकेत गेल्यावरच त्यांच्या कार्याचे खरे महत्त्व कळते” अकोला : “शिक्षकांच्या कार्याप्रति असणारे समर्पण त्यांच्या भूमिकेत गेल्यानंतरच खऱ्या अर्थाने कळते,” या भावनेतून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त केला. निमित्त होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिनाचे! स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा शिक्षण संचालित बाल शिवाजी शाळेत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित

Read more
1 2 3 … 12