🌿💧 जलसंवर्धनाचा संदेश देत बाल शिवाजी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन! 💧🌿 🏆 ‘पाण्याचे नियोजन, जीवनाचे संतुलन’ या विषयावर विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग! 🎨✍️

अकोला : विद्यार्थ्यांमध्ये जलसंवर्धनाविषयी जागरूकता निर्माण व्हावी, पाण्याचे महत्त्व पटावे आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजावी, या उद्देशाने इको क्लब अंतर्गत दि. २३ सप्टेंबर २०२६ रोजी जलसंवर्धन उपक्रमावर आधारित ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. ‘पाण्याचे नियोजन, जीवनाचे संतुलन’ हा या स्पर्धांचा विषय होता.
या उपक्रमांतर्गत इयत्ता 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा, इयत्ता 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा, तर इयत्ता 7 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी माती संकलन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेतून आणि सर्जनशीलतेतून जलसंवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. 🔹
✍️ १. निबंध स्पर्धा, इयत्ता दहावी
गट अ
🥇 प्रथम क्रमांक – कु. स्नेहल कैलास भाकरे
🥈 द्वितीय क्रमांक – कु. अदिती सचिन गावंडे
🔹 गट ब
🥇 प्रथम क्रमांक – कु. आर्या ज्ञानेश्वर आवारे
🥈 द्वितीय क्रमांक – कु. राजस्वी नारायण शेगोकार
🔹 गट क
🥇 प्रथम क्रमांक – चि. प्रणव सतीश नवले
🥈 द्वितीय क्रमांक – कु. समृद्धी मनीष मगर
🎨 २. पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा – इयत्ता नववी
🔹 गट अ
🥇 प्रथम क्रमांक – कु. सृष्टी संजय इंगळे
🥈 द्वितीय क्रमांक – चि. अधिराज मंगेश मुरूमकार
🔹 गट ब
🥇 प्रथम क्रमांक – कु. द्रिष्टी हरीश बंकावर
🥈 द्वितीय क्रमांक – कु. शर्वरी विजय म्हैसने
🔹 गट क
गट क
🥇 प्रथम क्रमांक – चि. अर्णव रवींद्र भांबेरे
🥈 द्वितीय क्रमांक – कु. तनया श्याम जायले
🌱 ३. माती संकलन स्पर्धा – इयत्ता सातवी व आठवी
🥇 प्रथम क्रमांक – चि. रुद्र मदन चोपडे (इयत्ता सातवी)
🥈 द्वितीय क्रमांक – चि. विदयेश संदीप पाटील (इयत्ता आठवी)

👏 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षिकांचे हार्दिक अभिनंदन! 💐
💧 “थेंब थेंब पाणी वाचवूया, भविष्याची जलसुरक्षा जपूया!” 💧
पाणी हे जीवनाचे मूलभूत साधन असून त्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन ही काळाची गरज आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता वाढून जलसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचण्यास निश्चितच मदत होईल.

🌿 आजची बचत, उद्याचे सुरक्षित भविष्य!