चिन्मय गीता पठण स्पर्धेत शांभवीचे घवघवीत यश….

🏆 आंतरराष्ट्रीय चिन्मय गीता पठण स्पर्धेत शांभवीचे घवघवीत यश! 🏆

अकोला जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक; राज्यस्तरीय फेरीसाठी निवड….

अकोला : आंतरराष्ट्रीय चिन्मय गीता पठण स्पर्धा २०२६ मध्ये ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेतील इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कु. शांभवी अभिषेक सोनगावकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत अकोला जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक पटकावले.

शांभवीने आपल्या प्रभावी, शुद्ध व आत्मविश्वासपूर्ण गीता पठणातून परीक्षकांची मने जिंकत प्रथम क्रमांक मिळविला. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे राज्यस्तरीय निवड फेरीसाठी तिची निवड झाली आहे.

शांभवीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल तिचे, तिच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिका यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका

सौ. कीर्ती चोपडे यांनी अभिनंदन करून सत्कार केला.