🏆 अभियांत्रिकी दिनानिमित्त पोस्टर सादरीकरणात बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी! 🏆

🔬💡 विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांना विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेची जोड! 💡🔬

अकोला (बाभूळगाव)  अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, अकोला. (COETA) तर्फे ‘राष्ट्रीय अभियांत्रिकी दिन’(Engineers’ Day) १५ सप्टेंबर २०२६ निमित्य आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर सादरीकरण (Poster Presentation) स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या १२ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उल्लेखनीय यश संपादन केले.

या स्पर्धेसाठी

🔹 Advances in Science, Engineering and Technology

🔹 Clean and Green Technology

हे विषय देण्यात आले होते.

🌟 वर्ग ८ मधील विद्यार्थ्यांचे यश :

🥇 स्वरा निलेश चिमणकर – प्रथम क्रमांक

🥈 श्रेया श्रीकांत वरोकार व आराध्या प्रफुल्ल काळणे – द्वितीय क्रमांक

🥉 आराध्या सुशील इंगळे – तृतीय क्रमांक

🌟 वर्ग ९ मधील विद्यार्थ्यांचे यश :

🥇 मनस्वी सारंग सूर्यवंशी – प्रथम क्रमांक

🥈 सायली विजय कुलकर्णी – द्वितीय क्रमांक

🏅 विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनाही सहभागाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या राधा कात्रे यांनाही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

विद्यार्थ्यांचे कौतुक व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, अकोला (बाभूळगाव) येथील प्राध्यापिका सौ. वैष्णवी वानखडे यांनी स्वतः शाळेत उपस्थित राहून विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्र प्रदान केले.

👏  या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यार्थ्यांचे शाळेतील मार्गदर्शक शिक्षिका आणि पालकांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे यांनी अभिनंदन केले.

✨ बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांची वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि नवकल्पनांची ही यशस्वी वाटचाल निश्चितच अभिमानास्पद आहे! ✨