आपल्या शाळेची माजी विद्यार्थी कु स्नेहल पुरी..Asst.RTO Akola (SSC Batch 2012) हिने आज शाळेला सदिच्छा भेट दिली….
व्यक्तिमत्व घडविणे, बुद्धिमत्ता वाढविणे!
He has secured second position in the second round of the same.
Read more
राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत इयत्ता आठवीची वेदश्री गोतमारे हिने सिल्वर मेडल प्राप्त केले आहे. वेदश्रीचे व तिच्या पालकांचे खूप खूप अभिनंदन.💐💐💐💐
Read more
विदर्भ विज्ञान उत्सव २०२४-२५ जुबली हायस्कूल इथे आयोजित करण्यात आला होता त्यात रांगोळी स्पर्धेत आपल्या शाळेची विद्यार्थीनी आस्था धाये हिचा दुसरा क्रमांक आला , सन्मानार्थी तिला ट्रॉफी रोख रक्कम ३०० आणि प्रमाणपत्र प्राप्त झाले …. आस्था चे खूप खूप अभिनंदन. ….💐💫
Read more
स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताच्या क्षेत्रातील अनमोल योगदानाचे स्मरण करण्यासाठी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने गणिताचे जीवनातील महत्त्व समजणे व गणिताविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड व कुतूहल निर्माण
Read more
सुमारे 38 वर्षांपासून इयत्ता 6 वी व 9 च्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत महाराष्ट्रसह विविध राज्यातून पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. ही स्पर्धा लेखी प्रात्यक्षिक पर्यावरण जतन व संवर्धनांवर आधारित कृती संशोधन प्रकल्प व मुलाखत अशा चार टप्प्यात घेतली जाते. या स्पर्धेतील चारही टप्पे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कस लावणारे असतात. यातील पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट सादरीकरण करत बाल शिवाजी शाळेतील वर्ग 6 वीच्या अकरा विद्यार्थ्यांनी व
Read more
दिनांक 22 /10/ 2024 मंगळवार रोजी स्व.अण्णासाहेब देव सभागृह येथे सकाळी 11 ते 12.30 या वेळेत वर्ग बालगट ते 10 वी पर्यंतच्या शिक्षीकांकरिता श्री. नरेंद्र देशपांडे सरांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन सौ.भारती कुलकर्णी यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करून प्रमुख अतिथीचा परिचय करून दिला. त्यानंतर श्री. नरेंद्र देशपांडे सरांनी मार्गदर्शनास सुरुवात केली. अध्ययन अध्यापन कार्य अधिक प्रभावी
Read more
दिनांक 10 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी बाल शिवाजी शाळेत परिवहन समिती सभा स्थापन करण्यात आली. परिवहन समिती साठी आवश्यक असलेल्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आले. त्यामध्ये पोलीस वाहन निरीक्षक श्री.मनोज शेळके, पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा श्री. जयवंत शिंदे तसेच शिक्षण केंद्रप्रमुख श्री. गोपाल सुरे, शाळा शिक्षक पालक संघ प्रतिनिधी श्री. विनोद इंगळे, श्री. दिनेश पांडव तसेच श्री. निलेश देव, वाहन चालक
Read more
दिनांक ०५/१०/२०२४ रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. भारतीय संस्कृतीत मातृशक्तीला पवित्र स्थान आहे. देवी भगवती दुर्गा ही साक्षात शक्ती रूपात सर्वत्र स्थित आहे. दुर्गेच्या या शक्ति रूपांचे सर्व स्त्री-पुरुषांमध्ये अधिष्ठान असतेच. केवळ या शक्तीचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणे, संयमतून नियंत्रण मिळवणे हेच खरे नवरात्री पूजन होय. दुर्गेचे रूप केवळ बघण्यासाठी नव्हे तर आत्मसात करण्यासाठी आहे.
Read more
दि.04/10/2024 मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता शाळेतील सभागृहात सखी सावित्री समितीची तिसरी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत सर्व सभासद उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.सभेमध्ये शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वी मधील विद्यार्थी हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहे. मोबाईल इंटरनेट वेगवेगळ्या ॲप्स द्वारा नको ते विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टिक्षेपात पडतात. ज्या वयात योग्य संस्कार रुजवायला हवे, त्या वयात विद्यार्थी/मुले नको त्या प्रलोभनाला बळी पडतात
Read more