जीवनात यशस्वी होण्यासाठी सामर्थ्यवान शरीराबरोबरच आत्मविश्वास, मनोनिग्रह, निर्भयता कायम ठेवा – सौ. वैशाली देशपांडे
स्थानिक जठारपेठ येथील बाल शिवाजी माध्यमिक शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून दि प्रोफेशनल कॉम्प्युटर्स,अकोला च्या संचालिका तसेच संस्थेच्या सहसचिव सौ. वैशाली देशपांडे ह्या लाभल्या होत्या. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष पद वर्ग ९ च्या संस्कृती विनायक पाठक हिने भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून झाली. प्रमुख
Read more