७४ वा प्रजासत्ताक दिन सोहळा बाल शिवाजी शाळेत उत्साहात संपन्न.
जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत ७४ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीताने उपस्थित सर्वांनी तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन सौ.अपेक्षा आवळे यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘हा देश माझा याचे भान’ हे समुहगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. किरण झटाले यांनी केले. वर्ग ८ वी च्या विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले.
Read more