ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित संस्कृत पाठांतर स्पर्धेत वर्ग आठवी ची श्रीविद्या स्वप्निल करंडे हिचा प्रथम, क्रमांक वर्ग तिसरीची शांभवी अभिषेक सोनगावकर व वर्ग पाचवी ची गिरीजा प्रसाद रानडे हिचा द्वितीय क्रमांक तसेच वर्ग सहावी ची रुपश्री दिनेश पांडव हिचा तृतीय क्रमांक आला………

या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षिकांचे व पालकांचे हार्दिक- हार्दिक अभिनंदन!!!!

Read more

कोठारी कॉन्व्हेंट तर्फे घेण्यात आलेली The Brijlal Biyani International School Science & Technology Meet 2024-25 मध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश…

यशस्वी विद्यार्थी :-वर्ग 3 रा : कैवल्य चैतन्य कुलकर्णी प्रथम क्रमांकवर्ग 5 वा : तन्मय सचिन ताडे प्रथम क्रमांकवर्ग 6 वा : श्रेयश विनायक पाठक प्रथम क्रमांकवर्ग 10 वा : अंजली अजय कराळे प्रथम क्रमांकसर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. विश्वनाथ गद्रे, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा

Read more

राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताच्या क्षेत्रातील अनमोल योगदानाचे स्मरण करण्यासाठी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने गणिताचे जीवनातील महत्त्व समजणे व गणिताविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड व कुतूहल निर्माण

Read more

बाल शिवाजीच्या बाल वैज्ञानिकांची यशोभरारी

सुमारे 38 वर्षांपासून इयत्ता 6 वी व 9 च्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत महाराष्ट्रसह विविध राज्यातून पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. ही स्पर्धा लेखी प्रात्यक्षिक पर्यावरण जतन व संवर्धनांवर आधारित कृती संशोधन प्रकल्प व मुलाखत अशा चार टप्प्यात घेतली जाते. या स्पर्धेतील चारही टप्पे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कस लावणारे असतात. यातील पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट सादरीकरण करत बाल शिवाजी शाळेतील वर्ग 6 वीच्या अकरा विद्यार्थ्यांनी व

Read more

बाल शिवाजी शाळेच्या आजी आजोबा मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात २४/०२/२४ रोजी सकाळी ८. ३० वा. आजी-आजोबा मेळावा’ उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी ‘ब्राहमण सभा ‘ संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अविनाश देव आणि ब्राहमण सभा संस्थेच्या कार्यकारिणी सदस्या सौ. अनघाताई देव हे आजी आजोबा लाभले. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी KG । च्या विद्यार्थीनींनी सरस्वती वंदना सादर केली. मेळाव्यात सर्वप्रथम आजी-आजोंबासाठी विविध

Read more

स्वा.सावरकरांची राजकीय हत्या करणे थांबवा – मा. श्री. शिवरायजी कुळकर्णी

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पणदिननिमित्त ब्राह्मण सभा अकोला तर्फे बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात रविवार दिनांक 25. 2. 2024 सायंकाळी ६. ०० वाजता अमरावती येथील प्रसिद्ध व्याख्याते मा. श्री. शिवराज्य कुळकर्णी , भा. ज. पा. महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले.  स्वा. विनायक दामोदर सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त   ब्राह्मण सभा अकोला तर्फे  आयोजित व्याख्यानाचा विषय ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नॅरेटिव वॉर !’ हा होता.  कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या

Read more

‘ विशेषाकडून ‘ सामान्याकडे रिद्धीचा असामान्य प्रवास. 

माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे शालेय जीवनातील महत्त्वाचा टप्पा ! पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास याच टप्प्यावर निर्माण होतो. अशाच दुर्दम्य आत्मविश्वासाचे उदाहरण म्हणजे अकोला येथील जठारपेठ  स्थित बाल शिवाजी शाळेच्या इयत्ता १० तील विद्यार्थिनी रिद्धी आशिष कांडलकर.  नुकताच इयत्ता १० चा निकाल लागला.  रिद्धीने ८५ टक्के गुण या परीक्षेत प्राप्त केले.  तिचा हा प्रवास सोपा नव्हता.  (कर्णबधीर) विशेष शाळेतून

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेला मा. डॉ. विश्वास सापटणेकर यांची सदिच्छा भेट

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेत १२ एप्रिल रोजी राष्ट्रीय कीर्तीचे स्कुबा डायवर तसेच उद्यमशील समाजव्रती डॉ श्री. विश्वास सापटणेकर यांनी सदिच्छा भेट दिली. शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना SMART GOAL विषयी सांगितले, आपल्या आयुष्यात नेहमी मोठे ध्येय ठेवा. ध्येय पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्यातील क्षमता  ओळखून त्याचा उपयोग तर तुम्ही योग्य वेळी, योग्य ठिकाणी केला तर जगात कुठेही तुम्ही

Read more

” स्वा . सावरकर हे क्रांतिकारकांचे कुलपुरुष तसेच विज्ञाननिष्ठ हिंदू संघटक होते ”  …… कु. भक्ती देशमुख  

स्वा . सावरकरांचे विविध पैलु  आणि  वर्तमानातील त्यांची प्रासंगिकता  ह्यांचे  चिंतन करतांना  पुण्याच्या युवा व्याख्याता    कु  भक्ती अरविंद देशमुख ह्यांनी स्वा. सावरकर ह्यांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलु , शतपैलु , सहस्त्रपैलुच नव्हे तर अनादी , अनंत  होते हे स्पष्ट केले .  उत्कृष्ट  देशभक्ती  आणि प्रखर  स्वातंत्र्यनिष्ठा  हा त्यांच्या कालोचित सशस्त्र क्रांतीमागील मूळ उद्देश होता .कु भक्ती  देशमुख ह्यांनी स्वा  सावरकरांच्या   जीवनाचे मुख्यतः तीन कालखंडात   वर्णन करतांना,  लंडन

Read more
1 2 3 4