राज्यस्तरीय चित्र व शिल्पकला स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचा राज्यात प्रथम क्रमांक 🎉
डॉ. भाऊसाहेब देशमुख आर्ट अकादमी, अमरावती आयोजित राज्यस्तरीय चित्र व शिल्पकला स्पर्धा व प्रदर्शन २०२६ मध्ये ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ येथील कलाशिक्षिका कु. राधा बाबुराव कात्रे यांनी विद्यार्थी विभागातून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवून शाळेचा व संस्थेचा लौकिक वाढविला आहे.
अमरावती येथे दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत तीन दिवसीय भव्य कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध प्रकारच्या उत्कृष्ट चित्रकला व शिल्पकलेच्या कलाकृती सादर करण्यात आल्या. कला रसिकांसाठी ही प्रदर्शनी विशेष आकर्षण ठरली.
या प्रदर्शनीचे उद्घाटन व बक्षीस वितरण समारंभ दिनांक १४ फेब्रुवारी रोजी उत्साहात पार पडला. या वेळी कु. राधा कात्रे यांना प्रमाणपत्र व रोख रुपये ५०००/- देऊन सन्मानित करण्यात आले.
या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य अनघा देव, शाळा समिती सदस्य, बाल शिवाजी माध्यमिक शाळा यांच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, तसेच बाल शिवाजी प्राथमिक शाळा यांच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग यांनी कु. राधा कात्रे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या यशामुळे बाल शिवाजी शाळेच्या कला क्षेत्रातील गुणवत्तेची पुन्हा एकदा राज्यस्तरावर नोंद झाली आहे
