बाल वारकरी रंगले विठ्ठल नामाच्या गजरात

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत ‘आषाढी एकादशी’निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्ग पहिलीच्या दोन विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणीची वेशभूषा केली तर इतर विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषा करून आले होते. ‘जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या गजरात टाळ वाजवत विद्यार्थ्यांनी दिंडी काढली.वर्गावर्गातून ‘आषाढी एकादशीचा’कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी गाणी,गोष्टी,अभंग, भारुडे सादर केली. कार्यक्रमात सर्व शिक्षिका सुद्धा उत्साहाने सहभागी

Read more

वृक्ष संवर्धन सप्ताह निमित्त रोप वाटप

१ जुलै ते ७ जुलै दरम्यान साजरा करण्यात येणाऱ्या वृक्ष संवर्धन सप्ताह निमित्त स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत गृहराज्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री मा.डॉ.रणजीतजी पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना आपल्या भाषणातून ‘वाढत्या प्रदूषणाला आळा घालायचा असेल तर जास्तीतजास्त वृक्ष लावायला हवेत; त्यांचे संगोपन व संवर्धन करायलाच हवे ‘ असे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांना विविध

Read more

बाल शिवाजी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. २६ जून शाळेच्या पहिल्या दिवशी चौथीच्या विद्यार्थ्यांनी पहिलीच्या विद्यार्थ्यांचे विविधरंगी फुगे देऊन स्वागत केले. विविध रंगांचे फुगे घेऊन बॅण्डच्या तालावर नृत्य करत विद्यार्थ्यांनी प्रवेशोत्सवाचा आनंद लुटला. याप्रसंगी मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे,सौ. भारती कुळकर्णी,सौ.शोभा अग्रवाल,सौ. संगीता जळमकर व सर्व शिक्षिका उपस्थित होत्या.  

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योगदिन संपन्न

योगविद्या ही भारताची प्राचीन व वैभवशाली परंपरा आहे. योगविद्येचे उगमस्थानच मुळी भारत देश आहे. पतंजली ऋषींनी फार पूर्वी योगाची सूत्रे लिहून योगसाधनेचे महत्त्व सांगितले. सुदृढ आरोग्य व मनःस्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ४ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय योगदिन सर्व जगभरात साजरा केला जातो. बलोपासनेचे महत्त्व विद्यार्थ्यांवर

Read more

हस्तलिखित “अंतर्नाद”

छात्र प्रबोधन,पुणे आयोजित राज्यस्तरीय शालेय हस्तलिखित स्पर्धा २०१८ मध्ये आमच्या शाळेच्या “अंतर्नाद” या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तलिखिताला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. या मासिकाची .pdf फाईल तुम्ही डाउनलोड करू शकता. हि .pdf फाईल २०.३MB ची आहे त्यामुळे डाउनलोड करण्यासाठी तुमच्या इंटरनेट स्पीड प्रमाणे थोडा वेळ लागू शकतो. फाईल डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही Adobe PDF Viewer मध्ये वाचू शकता.

Read more

विज्ञानाच्या निकषांवर जाहिरातींची सत्यासत्यता  पडताळून पहा :  श्री. सुहास उदपूरकर 

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन  विज्ञानप्रेमी मा. श्री. सुहास उदपूरकर यांच्या उपस्थितीत  अतिशय उत्साहात साजरा झाला.  या प्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या निकषांवर जाहिरातींची सत्यासत्यता  पडताळून  पाहण्याचे  आवाहन केले. जाहिरातीतील मिथक ओळखावे त्यांना फसू नये.  पाणी हे सुद्धा एक केमिकल आहे असे सांगितले. या प्रसंगी ख़ुशी नितीन मोहोड ने विज्ञानाचे नवे शोध यामध्ये सहज अपघटन होऊ शकण्याऱ्या व खाण्यायोग्य पिशाव्यांची माहिती दिली.

Read more

भूगोल प्रदर्शनीचे उद्घाटन  

शालेय विद्यार्थ्यांना भूगोल विषयाची  अधिक माहिती मिळावी या दृष्टीकोनातून जठारपेठ स्थित स्वा.सावरकर सभागृह येथे बुधवार २१. ०२. २०१८ रोजी निसर्ग अभ्यास केंद्र व बाल शिवाजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भूगोल प्रदर्शनी २०१८ चे उद्घाटन बाल शिवाजी शाळेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, निसर्ग शिक्षण कार्यसंस्थेचे प्रमुख मा. श्री. प्रभाकर दोड, श्री. सुनिल सरोदे, 

Read more

वक्तृत्वातील सप्त सूर ओळख – प्रा. कल्पना तायडे

स्थानिक बालशिवाजी प्राथमिक शाळेत, शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या ७ फेब्रुवारी या स्मृतिदिना प्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे अध्यक्ष अविनाश देव होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून तुळसाबाई कावल महाविद्यालय पातूर, च्या प्राध्यपिका सौ. कल्पना तायडे लाभल्या होत्या . विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाल्या ” वक्तृत्वातील सप्तसुर म्हणजेच – सातत्य , रेटा, गती, मधाळ वाणी,

Read more

Come pick and speak

अकोला-   अकोला जिल्ह्यात आयोजित विविध शाळांमधील आंतरशालेय स्पर्धेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील  विदयार्थ्यांनी  उत्कृष्ट  सादरीकरण करून भरघोस यश मिळविले  आहे. श्री शिवाजी विद्यालय अकोला येथे आयोजित स्वयंस्फूर्त  ‘Come pick and speak’ या वक्तृत्व स्पर्धेत  कु आस्था अभय अग्रवाल  वर्ग ९ वा  हिने ‘  My Aim in Life ‘या  वेळेवर देण्यात आलेल्या   विषयावर उत्कृष्टपणे आपले विचार मांडून प्रथम स्थान पटकाविले तर परशुराम नाईक

Read more

राष्ट्रीय युवक दिन

स्थानिक बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय युवक दिन म्हणजेच विवेकानंद जयंती व राष्ट्रमाता जिजाबाई जयंती उत्साहात सादर करण्यात आली. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून वर्ग ९ वी चा विद्यार्थी यश खुमकर  होता. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्षाचे  स्वागत साहिल देशमुख याने केले. सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाबाई  यांच्या कार्यास साक्षी सारभूकन हिने आपल्या भाषणातून मानवंदना दिली. चैतन्य कुलकर्णी याने विवेकानंदाचे विचार आपल्या मनोगतातून

Read more
1 4 5 6 7 8 12