🙏🌺अथर्वशीर्षाचे पंचसहस्त्रावर्तन; बाल शिवाजी शाळेत भक्ती-संस्कारांचा मंगलमय संगम! 🙏🌺

कोला | दि. १५ सप्टेंबर २०२६गणेशोत्सवाचे औचित्य साधून ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत अथर्वशीर्षाचे पंचसहस्त्रावर्तन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त आणि अध्यात्मिक मूल्यांची रुजवणूक व्हावी, या उद्देशाने दरवर्षी शाळेत अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण आयोजित केले जाते.🕉️ यावर्षी तब्बल १,००० विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने अथर्वशीर्षाचे ५,००० आवर्तन केले. गणपती बाप्पाच्या चरणी श्रद्धा अर्पण करत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वेदपठणाच्या वातावरणामुळे

Read more

बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात; विद्यार्थ्यांनी सांभाळली शालेय व्यवस्थापनाची धुरा…

“शिक्षकांच्या भूमिकेत गेल्यावरच त्यांच्या कार्याचे खरे महत्त्व कळते” अकोला : “शिक्षकांच्या कार्याप्रति असणारे समर्पण त्यांच्या भूमिकेत गेल्यानंतरच खऱ्या अर्थाने कळते,” या भावनेतून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व आदर व्यक्त केला. निमित्त होते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिनाचे! स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा शिक्षण संचालित बाल शिवाजी शाळेत ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी आयोजित

Read more

🌸 बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्साहात साजरी! 🌸

📍 अकोला : ब्राह्मण सभा शिक्षण संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.🪔 श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रमुख अतिथी सौ. शीतल समीर थोडगे यांचे स्वागत विद्यार्थिनी नीती सौरभ सारडा हिने गुलाबपुष्प देऊन केले.🎤 कार्यक्रमाचे संचलन इयत्ता तिसरीतील विद्यार्थी स्वरा धीरज गिरी व राजवीर विठ्ठल गोमासे

Read more

कुटुंब प्रबोधनातून सुसंवाद, संस्कार आणि दृढ नात्यांचा संदेश

बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी पालकांच्या उत्स्फूर्त सहभागात ‘कुटुंब प्रबोधन’ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच कुटुंबातील सुसंवाद, संस्कार, परस्पर सामंजस्य आणि पालक-पाल्याचे नाते दृढ व्हावे, हा कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी श्री. राजेंद्र उमाळे, सौ. वैशाली फडणीस, श्री. प्रकाशजी सोनगावकर व डॉ. राधा पुरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने

Read more

बाल शिवाजीच्या सातवीच्या विद्यार्थ्यांची कृषी विद्यापीठात वनौषधींची अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट | नागार्जुन विभाग, अकोला

बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील नागार्जुन विभागात वनौषधींची पाहणी करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध वनौषधींची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे औषधी गुणधर्म, उपयोग, महत्त्व आणि संवर्धन याबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने निरीक्षण करत विविध प्रश्न विचारून विषयाचे ज्ञान आत्मसात केले. यावेळी मा. प्रा.

Read more

बाल शिवाजी शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा!

जठारपेठ येथील ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.माध्यमिक शालांत परीक्षा २०२६-२७ मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या चि. युगंधर निलेश पाकदुने व चि. अभिनव निलेश सोनी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे सहसचिव श्री. नरेंद्र देशपांडे यांनी युवा पिढी हीच देशाचे उज्ज्वल भविष्य असून स्वातंत्र्याचे रक्षण

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेत क्रांती दिन उत्साहात साजरा…!

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत क्रांती दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याला आणि त्यागाला अभिवादन केले.🎭 वर्ग १ ते ६ – क्रांतिकारक वेशभूषा स्पर्धावर्ग १ ते ६ मधील विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा साकारत त्यांच्या कार्याची माहिती तसेच घोषवाक्ये सादर केली.🏆 वर्ग १

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला

किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी समुपदेशनाचे यशस्वी आयोजन  बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे रोटरी क्लबच्या वतीने किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळा समिती सदस्या सौ. वैजयंती पाठक, बाल शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, कीर्ती चोपडे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.  विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना प्रमुख वक्त्या रोटरी क्लबच्या संचालिका मा. डॉ. मनीषा राठी यांनी

Read more

बाल शिवाजी शाळेत विठ्ठलनामाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी….

“ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. यानिमित्त संपूर्ण शाळा विठ्ठल नामाच्या अखंड गजराने दुमदुमून गेली असून, सर्वत्र भक्तिमय आणि आनंदमय वातावरणाची अनुभूती निर्माण झाली.” वर्ग 1 ली तील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होत संत परंपरेचा उत्साहाने अनुभव घेतला. यज्ञेश योगेश बोरे याने विठ्ठलाची आणि दैवी सिद्धेश सावंत हिने

Read more

बाल शिवाजी शाळेत आर्यभट्ट खागोल मंडळाचे उदघाटनतसेच बाल विज्ञान परिषद मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

 ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी बाल शिवाजी शाळेत आर्यभट्ट खगोल मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावर्षी या मंडळाचे हे दुसरे वर्ष आहे. याप्रसंगी मा. श्री. नितीन ओक सर हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. अवकाशातील खगोलीय घटनांबाबत विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल असते आणि या कुतूहलाला खतपाणी देण्याचे प्रमुख काम या मंडळातर्फे करण्यात येते व विविध उपक्रम घेण्यात येते. याप्रसंगी सरांनी खगोलशास्त्राचा  थोडक्यात परिचय

Read more
1 2 3 17