क्षेत्रभेट: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

क्षेत्रभेट –  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध ठिकाणी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते , त्यातून दैनंदिन व्यवहारातील अनुभव त्यांनी घेतले २३. अकोला जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित गणित संबोध परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

Read more

वाचन प्रेरणा दिन

भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाला शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन करून त्यांना आदरांजली वाहिली . त्याचे औचित्य साधून दिनांक १७ ते २२ ऑक्टोबर या काळात पालकांसाठी विशेष ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन केल्या गेले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमासाठी  शाळेतील शिक्षिका मेधा क्षीरसागर यांना   वाचनासाठी आमंत्रित केल्या गेले .

Read more

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी: मार्गदर्शन

I .M. A. अकोला तर्फे   १३ ऑक्टोबर रोजी अकोल्यातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञांनी जागतिक दृष्टी दिन चे औचित्त साधून डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या बद्दल मार्गदर्शन केले .

Read more

महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती

२ ऑक्टोबर २०१६ रोजी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री या महामानवांची जयंती साजरी करण्यात आली. तसेच त्या निमित्त बाबूजी देशमुख वाचनालया तर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सानिका देशमुख हिने प्रथम क्रमांक पटकावला. वन्यजीव विभाग अकोला तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेतही आपल्या शाळेने तीनही गटात बाजी मारली.

Read more

स्व. अण्णासाहेब देव स्मृति प्रित्यर्थ विविध आंतरशालेय स्पर्धां

स्व .अण्णासाहेब देव स्मृति प्रित्यर्थ विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या मध्ये विविध शाळांतील जवळपास ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी  यश संपादन केले. यातील पाठांतर , चित्रकला , स्मरणशक्ती , बुद्धिबळ , निबंध  स्पर्धेत शाळेने प्रथम स्थान पटकावीत बाजी मारली. तसेच २९ सप्टेबर २०१६ रोजी स्व .अण्णासाहेब देव स्मृति प्रित्यर्थ  ‘तंत्र विज्ञानाच्या युगातही सण  पारंपारिक पद्धतीने साजरे करायला हवेत/नकोत ‘ या विषयावर वादविवाद स्पर्धेत ११

Read more

शिक्षक दिन

दिनांक ३ सप्टेंबर २०१६ रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. १० वी च्या   विध्यार्थ्यानी स्वयंशासन हा उपक्रम राबवून शिक्षकांची जबाबदारी पार पाडण्याच्या अनुभव घेतला. तसेच या दिवशी शिक्षिकांना व त्यांच्या आवडीचे ग्रंथ देण्यात आले.

Read more
1 9 10 11 12 13