महाराष्ट्र राज्य कराटे संघटनेशी संलग्न असलेली अकोला महानगर असोसिएशन तर्फे दिवेकर कराटे व्यायाम शाळा, जठारपेठ अकोला येथे कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. 🥋✨

या स्पर्धेत बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे 🥇 वर्ग 3 री – ज्ञानेश अमोल मराठे👉 (नऊ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक)🥇 वर्ग ६ वी – पद्मजा अमोल मराठे👉 (14 वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक) 🥇 वर्ग ५ वी – श्रीहरी संजय आवारे👉 (१४ वर्षे आतील गटात प्रथम क्रमांक) या तिघांचीही छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता

Read more

राष्ट्रीय अंतरिक्ष दिवसानिमित्त शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या आणि इस्रो विज्ञान यात्रेसाठी निवड झालेल्या सौ.पूर्वा सोमण आणि सौ. शीतल थोडगे तसेच गिरिजा दळवी आणि अर्णव भांबेरे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐

Read more

बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न

शिक्षकांचे कार्यप्रति असणारे समर्पण त्यांच्या भूमिकेत गेल्यानंतरच कळते या शब्दात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाला आपल्या भावना व्यक्त केल्या स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन व अध्यापन कार्य स्वयंशासन या उपक्रमांतर्गत उत्तम रीतीने पार पाडले शिक्षकां प्रतिकृती व्यक्त करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ग दहावीचा

Read more

🌸✨ अथर्वशीर्ष पंच सहस्त्रवर्तन 🙏 ✨🌸

अकोला येथील बाल शिवाजी शाळेत ब्राह्मण सभा यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त अथर्वशीर्ष पंच सहस्त्रवर्तन उत्साहात पार पडले. 🎶 शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता जळमकर, सचिव मोहन गद्रे व कीर्ती चोपडे यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी तन्मयतेने सामूहिक पठण केले. शेवटी गणपतीची आरती व “गणपती बाप्पा मोरया” जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. 🙌✨

Read more

जलतरण स्पर्धेत विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

अकोला येथे क्रीडा व युवकसेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत शिवराज योगेश सरप व आनंद बजरंग गावंडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरासाठी निवड मिळवली आहे. या यशामागे त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे शाळा परिवाराने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read more

टेबल टेनिस स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत.. 14 वर्षाखालील मुलींत वीरा अजय महाजन  17 वर्षाखालील मुलींत वृंदा विनोद इंगळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत विभागीय स्तरावर निवड मिळवली आहे. दोन्ही विजेत्या खेळाडूंना मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा!

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी उत्साहात…….

ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन वर्ग तिसरीची विद्यार्थीनी अद्वैता शिवाजी देशमुख ज्ञानेश अमोल मराठे यांनी केले. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून श्रीकृष्णच्या प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या मा. सौ वैशाली अजय पाटील यांचे स्वागत सुरभी शिरीष परळीकर हिने पुष्प देऊन केले, कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या श्रीहरी स्तोत्राने

Read more

बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा 🎉

ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.माध्यमिक शालांत परीक्षा 2024 मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या पयोष्णी विक्रम घाईट हिच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या प्रसंगी संस्थेचे सचिव मा. श्री. मोहन गद्रे यांनी विद्यार्थ्यांना भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी योगदान द्यावे असे मार्गदर्शन केले, तर सौ. वैशाली देशपांडे यांनी चांगल्या सवयी व शिस्तीचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी राज्यगीत, जयोस्तुते,

Read more

अनामवीरा गीत गायक स्पर्धेत बाल शिवाजी शाळेचा प्रथम क्रमांक…

स्कूल ऑफ स्कॉलर्स तर्फे आयोजित अनामवीरा गीत गायक स्पर्धेत बाल शिवाजी शाळेने आपला उत्कृष्ट ठसा उमटवत प्रथम क्रमांक पटकावला. या विजयानिमित्त शाळेला ट्रॉफी प्रदान करण्यात आली. गट ‘अ’ मध्ये केजी- 1 चा स्वराज समीर थोडगे याने प्रभावी सादरीकरण करून प्रथम क्रमांक मिळविला. गट ‘ब’ मधून बाल शिवाजी शाळेच्या खालील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला :गिरीजा प्रसाद रानडे, जीविका संतोष रामटेके, जान्हवी गणेश

Read more

‘संस्कृत हे साध्य नाही तर प्राचीन ज्ञानापर्यंत पोहोचवण्याचे साधन आहे’ मा. डॉ. प्राची पिंपरकर…..

संस्कृत दिन व क्रांती दिन आणि नारळी पौर्णिमा या त्रिवेणी संगमाचे औचित्य साधून बाल शिवाजी शाळेत विविध कार्यक्रम सादर करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. डॉ. प्राची पिंपरकर उपस्थित होत्या. दीप प्रज्ज्वलन आणि प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर यांनी प्रमुख अतिथींचे स्वागत केले. संस्कृत भाषेचे ऋषिमुनींच्या योगदानाचे महत्त्व संस्कृत गीतातून

Read more
1 3 4 5 6 7 13