बाल शिवाजी शाळेची माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तुंग भरारी

Covid – 19 च्या प्रादुर्भावामुळे SSC बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले होते.  इयत्ता ९ वी चे ५०% गुण व इयत्ता १० वी  चे ५० % निर्धारित केलेल्या  गुणदान पद्धतीनुसार निकाल घोषित करण्यात आला. स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घवघवीत यश प्राप्त केले असून  सलग २० वर्षांपासून शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.  ऋचा अनंत देशपांडे हिने सर्वाधिक ९९. ८० % गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा

Read more

बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

Wisdom Education Foundation, Pune  तर्फे दरवर्षी वर्ग ३ री ते ८ वी साठी Science आणि Maths  या विषयांच्या स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. यावर्षी या स्पर्धा परीक्षा Online घेण्यात आल्या. त्यामध्ये वर्ग ७ वी ची संस्कृती विनायक पाठक हिने Science  Wisdom  या परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळविले आहे. Maths Wisdom या परीक्षेत संस्कृतीने  राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आठवे स्थान मिळविले आहे. वर्ग ६

Read more

बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन संपन्न

शनिवार ५ सप्टेंबर  रोजी  शिक्षक दिनाचा आगळा वेगळा कार्यक्रम बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या वर्ग १० वी च्या  विद्यार्थ्यांनी  online सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे जीवनकार्य सानिका संगवई हिने आपल्या इंग्रजी भाषणातून  विशद केले तर ऋचा देशपांडे हिने माशेलकरांच्या आयुष्याला भावे सर यांच्यामुळे कशी कलाटणी मिळाली या विषयीची 

Read more

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिन साजरा

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.  याप्रसंगी व्यासपीठावर  मा.डॉ. श्री.संजय देवडे प्राध्यापक, शंकरलाल खंडेलवाल महाविद्यलाय, अकोला व  प्रा.सौ. वैजयंती पाठक सदस्य कुतूहल संस्कार केंद्र,अकोला हे उपस्थित होते. डॉ. सी. व्ही. रमण व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने  कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. मा.डॉ. श्री.संजय देवडे यांचे  स्वागत संस्थाध्यक्ष श्री.अविनाश देव व संस्था सचिव श्री. मोहन गद्रे सर यांनी गुलाबपुष्प देऊन केले.  या प्रसंगी बोलताना मा.डॉ. श्री.संजय देवडे यांनी ” प्रत्येक

Read more

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केले. खंडेलवाल इंग्लिश स्कूल व कुतूहल संस्कार केंद्र यांच्या तर्फे आयोजित ‘Science Meet २०१८’  मध्ये विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थी सह्भागी झाले होते. त्यात  ‘Science Quiz’ मध्ये वर्ग ४ च्या आयुष गजानन जळमकर आणि श्रीप्रसाद पंकज देशमुख यांच्या गटाने उत्तम सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक मिळाले तसेच शाळेला रनिंग ट्रॉफी मिळाली आहे. ‘Do  it Yourself

Read more

शिवजयंती उत्साहात साजरी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांची बाल शिवाजी शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अभय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपतींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘ छत्रपती  शिवाजी राजे मराठी अस्मितेचे रक्षक ‘ या विषयावर विधी झामरे

Read more

१० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा

दरवर्षीप्रमाणे वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग ९ वीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. यात वर्ग ९ वी च्या वरदा बिडवई हिने स्वरचित कवितेतून तर श्रीहरी जवंजाळ याने आपल्या भाषणातून वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या. वर्ग १० वी च्या रसिका गोसावी हिने स्वरचित कवितेतून शाळेप्रती कृतज्ञ भावना व्यक्त केली. ख़ुशी मोहोड व स्नेहा ढोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर यांनी विद्यार्थ्यांना ‘जिद्द व चिकाटी ठेवून चांगले

Read more

आजी आजोबा मेळावा उत्साहात संपन्न

बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात  आजी आजोबा मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीवल्लभजी निकते व डॉ. सौ. आशा निकते हे लाभले. सरस्वती पुजन व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात  करण्यात आली. यानंतर देवश्री दत्तात्रय कराळे हिने सूर्यकवच स्तोत्र सादर केले. तर आरोही राहुल महाशब्दे हिने सूर्यस्तोत्रम सादर केले. वर्ग ४ च्या विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध हा पोवाडा सादर केला.मेळाव्यात

Read more

बाल शिवाजी शाळेची आस्था वक्तृत्व स्पर्धेत प्रथम

तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पातूर येथे जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व  स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.  या स्पर्धेत एकूण २३ शाळांचे विद्यार्थी सहभागी झाले होते. स्पर्धेचा विषय  ‘Increasing stress on students – Responsible factors and their solutions’ हा होता. बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील आस्था राकेशसिंह बैस च्या वर्ग ८ च्या विद्यार्थिनीने अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण करून स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. तिला

Read more
1 2 3 4