‘दीपध्यान’ उपक्रमातून विद्यार्थ्यांना सकारात्मकतेचे मार्गदर्शन

बाल शिवाजी शाळेत लाईफ इन बॅलन्स संकल्पनेतून मार्गदर्शन सत्र संपन्न जीवनात आनंदी, समाधानी आणि यशस्वी होण्यासाठी ज्ञानासोबतच आरोग्य आणि आर्थिक समृद्धी यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यासाठी आवश्यक असलेली एकाग्रता आणि सकारात्मक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दैनिक सकाळच्या एलआयबी (Life In Balance) कार्यक्रमाचे राज्यप्रमुख सुधीर सुतार यांनी केले. ते बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला

Read more

बाल शिवाजी शाळेत विठ्ठलनामाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी….

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी संपूर्ण शाळा विठ्ठलनामाच्या गजरात न्हालेली दिसली.वर्ग 1 लीतील विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी होत परंपरेचा उत्साहाने अनुभव घेतला. शौर्य नितीन बंडावार याने विठ्ठलाची आणि अदिती अमोल झामरे हिने रखुमाईची वेशभूषा साकारली. ज्ञानबा-तुकाराम या जयघोषात विद्यार्थ्यांनी रंगतदार फेऱ्या घेतल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून तुकाराम

Read more

बाल शिवाजी शाळेत आंतरराष्ट्रीय प्लास्टिक मुक्ती दिन उत्साहात साजरा

स्थानिक ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत ‘स्वच्छ अकोला, सुंदर अकोला’ या उपक्रमांतर्गत ३ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्तदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी मनपा अकोला येथील माननीय हरिश्चंद्र इटकर सर, पर्यावरण अधिकारी माननीय अनिल बडवे सर, तसेच पर्यावरण कार्यकर्ता व समन्वयक माननीय निलेश देव सर यांची उपस्थिती लाभली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जळमकर

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव

बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ येथे 23 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतार्थ पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात, फुलांनी व ओवाळून स्वागत करण्यात आले. शाळा फुगे, रांगोळ्या व स्वागतद्वाराने सजवण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. रांगोळीत ‘ॐ’ काढून विद्यार्थ्यांनी सरस्वतीचे आशीर्वाद घेतले. Adop Tree Foundation मार्फत रोपांचे वाटप करण्यात आले. शाळेचे सचिव श्री. मोहन

Read more

नियमित योगसाधने द्वारे विद्यार्थ्यांनी स्व विकास साधावा.सौ. मनीषा नाईक

ब्राह्मण सभा अंतर्गत बालशिवाजी माध्यमिक शाळेत 21 जून रोजी योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते 25 वर्षांपासून योगाभ्यासाचे धडे देणाऱ्या सौ.मनीषा नाईक मॅडम अध्यक्षस्थानी होत्या.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.वर्ग दहावीची विद्यार्थिनी अदिती शंकर पाटील हिने ओंकार साधनेचे महत्त्व आपल्या भाषणातून विशद केले, तर आरोही राहुल महाशब्दे हिने वर्ग 10 वी साठी आयोजित योगवर्गाबद्दलचे मनोगत व्यक्त केले. यानंतर

Read more

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे – मधुरा ठोंबरे – कुळकर्णी

बालशिवाजी माध्यमिक शाळेला माजी विद्यार्थिनी मधुरा ठोंबरे कुळकर्णी हिने भेट दिली.L.L.B.,L.L.M. ह्या कायद्याच्या पदव्या संपादन केलेली मधुरा  सध्या नवरचना विद्यापीठ,बडोदा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. व International  law या विषयात P.hd. करते आहे.यावेळी तिने वर्ग  नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची संवाद साधला व त्यांना करिअर निवडी विषयक मार्गदर्शन केले. कला ,वाणिज्य व विज्ञान शाखांमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती तिने विद्यार्थ्यांना यावेळी दिली

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन संपन्न……

बाल शिवाजी शाळेत बुधवार दि. 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजास राष्ट्रगीताने मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सौ. अपेक्षा आवळे यांनी कामगार दिन विषयीची महती सांगताना समाजात होणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभे राहणे गरजेचे व ते आपले कर्तव्यच आहे. असे प्रतिपादन केले. पियुष काळे

Read more

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक रॅलीचे आयोजन…

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांकडून पर्यावरणपूरक व पर्यावरण रक्षणासाठी जनजागृतीपर रॅलीचे यशस्वी आयोजन केले. या रॅलीत इयत्ता 1 ली ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला .विद्यार्थ्यांनी हातात फलक घेत पर्यावरण वाचवा, झाडे लावा, पाणी वाचवा असे नारे दिले. मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व कीर्ती चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. रॅली शाळेपासून परिसरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आली. शहरातील

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेची चमू आंतरशालेय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत अव्वल….

स्व.शंकरलालजी यांच्या स्मृति प्रित्यर्थ, खंडेलवाल इंग्लिश प्रायमरी स्कूल व कुतूहल संस्कार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित सायन्स मीट मध्ये वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन केले जाते. अकोल्यातील तसेच अकोल्या बाहेरील अनेक शाळांनी स्पर्धेत सहभाग घेतला. त्यामध्ये सर्वोत्तम आठ चमूंची सायन्स क्विझ या स्पर्धेसाठी प्रथम निवड करण्यात आली. त्यानंतर पुढील आठ चमुंच्या पाच फेऱ्या मंचावर सादर करण्यात आल्या. त्यात वर्ग चौथीचा वरद

Read more

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित संस्कृत पाठांतर स्पर्धेत वर्ग आठवी ची श्रीविद्या स्वप्निल करंडे हिचा प्रथम, क्रमांक वर्ग तिसरीची शांभवी अभिषेक सोनगावकर व वर्ग पाचवी ची गिरीजा प्रसाद रानडे हिचा द्वितीय क्रमांक तसेच वर्ग सहावी ची रुपश्री दिनेश पांडव हिचा तृतीय क्रमांक आला………

या सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षिकांचे व पालकांचे हार्दिक- हार्दिक अभिनंदन!!!!

Read more
1 2 3 4 5 6 8