बाल शिवाजी प्राथमिक शाळा व माझी बाल शाळेत गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्साहात संपन्न…. 

जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत सावरकर सभागृहात गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन वर्ग ३ री ची ज्ञानदा देशपांडे व वरद गंगाखेडकर यांनी केले. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत रियांश कुळकर्णी याने पुष्प देऊन केले. सर्वप्रथम श्रीकृष्ण स्वगत समर्थ ढोरे याने सादर करण्यात आले. अभिश्री खपली हिने श्रीकृष्ण व अर्जुनाची गोष्ट सादर केली. ‘ श्रीकृष्णाचे

Read more

बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांनी घेतले स्वयं शासनाचे धडे 

स्थानिक बाल शिवाजी शाळेत शिक्षकदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.  सावरकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ब्राह्मण सभा सचिव श्री. मोहन गद्रे , सहसचिव सौ. वैशाली देशपांडे, संस्थेचे सदस्य श्री नरेंद्र देशपांडे ,बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, शाळेतील सर्व शिक्षिका, पालकवर्ग  व विद्यार्थी उपस्थित होते.  वर्ग १० वी च्या

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेत संस्कृत दिन तथा रक्षाबंधन उत्साहात संपन्न

‘ संस्कृत आणि विज्ञान विषयाची सांगड घालून संस्कृत भाषेचा वारसा जपावा ‘… मा. डॉ. सुचेता चिने  ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी माध्यमिक शाळेत संस्कृत दिन तथा रक्षाबंधन उत्साहाने संपन्न झाला.या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भिकमचंद खंडेलवाल महाविद्यालयातील शिक्षिका मा.डॉ. सुचेता चिने लाभल्या होत्या.  भाषा जननी गीर्वाण भारती असलेल्या संस्कृत भाषेची श्रेष्ठता दर्शविणारा कार्यक्रम याप्रसंगी सादर करण्यात आला. मान्यवरांना  हस्ते दिपप्रज्वलन  करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  माध्यमिक

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी 

बाल शिवाजी प्राथमिक शाळेत 1 ऑगस्ट या दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी वर्गावार साजरी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी टिळकांच्या जीवनातील प्रसंग, गोष्ट, कविता, माहिती इत्यादी सादर केली. तसेच त्यांची देशभक्ती व त्यांनी केलेले स्वातंत्र्य चळवळीतील कार्य, स्वदेश प्रेम ही माहिती विद्यार्थ्यांनी सांगितली.  त्याचबरोबर टिळक यांच्या शालेय जीवनातील प्रसंग व लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची  भावना निर्माण करण्यासाठी त्यांनी सुरू केलेले गणेशोत्सव

Read more

बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न 

स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.  माध्यमिक  शालान्त परीक्षेत  शाळेतून प्रथम  येण्याचा बहुमान प्राप्त करणारा गौरी प्रशांत साबळे हिच्या  हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले.  त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी स्वा.सावरकर रचित ‘जयोस्तुते…’ हे समूहगीत सादर केले. क्रांतिकारकांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग नवल पाथरे याने सांगितला. तसेच स्वातंत्र्यसंग्रामातील गाजलेल्या घोषणांविषयी माहिती रेवती घोगरे व वेदांत कुटे या विद्यार्थ्यांनी सांगितली. ब्रिटिश सरकारला हादरून

Read more

तानसेन संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश 

ब्राह्मण सभा अंतर्गत येणाऱ्या तानसेन संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मिरज तर्फे आयोजित शास्त्रीय संगीत परीक्षेत(सत्र २०२३) घवघवीत यश प्राप्त केले आहे. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून सर्व विद्यार्थी विशेष योग्यता प्रथम श्रेणीमध्ये पास झाले आहे.  यामध्ये गायन प्रारंभिक परीक्षेत आर्या शेंडकर,अभिषेक खपली, जीविका रामटेके, अनुश्री चौखंडे, तनुश्री गव्हाळे, पद्मजा मराठे, कृष्णाई राऊत, पयोष्णी देशपांडे, वल्लरी रेलकर

Read more

बाल शिवाजी शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत 

जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक सत्रानुसार ३० जून शुक्रवार रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी बालगटाच्या व वर्ग १ली, २ री च्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.  सर्व शिक्षिकांनी हर्षोल्ल्हासात विद्यार्थ्यांचे औक्षण करून,फुले देऊन स्वागत केले. तसेच फुले घेऊन बॅण्डच्या तालावर विद्यार्थ्यांनी जल्लोषात शाळेत प्रवेश केला. विद्यार्थ्यांनी सरस्वती पूजन केले आणि रांगोळीमध्ये ओम गिरवून वर्गात प्रवेश केला.  वर्ग २

Read more

बाल वारकरी रंगले विठ्ठल नामाच्या गजरात…….  

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत ‘आषाढी एकादशी ‘ निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्ग ३ रीच्या दोन विद्यार्थ्यांनी विठ्ठलाची वेशभूषा शौर्य कुणाल गुंजाळ याने आणि रखुमाईची वेशभूषा श्रावणी शैलेश कोतवाल हिने केली तर इतर विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेशभूषा करून आले होते. शाळेच्या पटांगणात ‘जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल’ या गजरात टाळ वाजवत विद्यार्थ्यांनी दिंडी काढली.वर्गावर्गातून ‘आषाढी एकादशीचा’कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी

Read more

वाचन, चिंतन, मनन या त्रिसूत्रीचा अवलंब करून यशस्वी व्हा  – श्री. अविनाश देव

ब्राह्मणसभा संकुल अंतर्गत बाल शिवाजी शाळेत महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांच्या शुभहस्ते  ध्वजारोहण करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘गर्जा महाराष्ट्र  माझा  ‘ या राज्यगीतातून महाराष्ट्राचा जयजयकार केला. अवनी टोपले हिने आपल्या भाषणातून  महाराष्ट्र निर्मितीची कथा आणि त्यानंतर महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला.  तर श्रीहरी राऊत ह्याने कामगार नेते श्री. नारायण मेघाजी लोखंडे

Read more
1 2 3 4