बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनला शैक्षणिक भेट

इयत्ता आठवीच्या नागरिकशास्त्रांत विद्यार्थ्यांना कायदा  व  सुव्यवस्था या संबंधित पाठाच्या अनुषंगाने  ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ हे व्रत निष्ठेने जपणाऱ्या पोलिसांचे कार्य, पोलिस यंत्रणा, कामकाजाची पध्दत सर्वांची माहिती करून घेण्यासाठी स्थानिक जठारपेठ येथील बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी सिव्हिल लाईन पोलिस स्टेशनला शनिवार दि-09-03-24 ला  शैक्षणिक भेट दिली. पोलिस स्टेशनचे निरीक्षक मा .श्री अजित जाधव यांनी विद्यार्थ्यांना पोलिसांचे कामकाज कसे चालते, स्त्रियांच्या  सुरक्षिततेसाठी

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेत वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात साजरा

दरवर्षीप्रमाणे वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी वर्ग ९ वीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाचे आयोजन शाळेत करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  वर्ग ९ वी चा विद्यार्थी स्वानंद मोडक याने भूषविले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. वर्ग ९ वी च्या आदित्य जोशी याने  आपल्या भाषणातून वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांना शालान्त परीक्षेकरिता शुभेच्छा दिल्या. वर्ग १० वी च्या गीत परळीकर व सायली इंगळे यांनी  स्वरचित कवितेतून शाळेप्रती कृतज्ञ

Read more

विद्यार्थी जीवनात ध्येय निश्चित असावे  –  मा. अक्षय राऊत

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्याने बाल शिवाजी शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलताना ‘ शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व कार्याची प्रेरणा भावी पिढीने घ्यावी, राष्ट्रहिताचा विचार करून देशकार्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा तसेचमहाराजांच्या जीवन कार्यावरील पुस्तकांचे वाचन करावे’ असे मार्गदर्शन मा. अक्षय राऊत यांनी याप्रसंगी केले.       स्थानिक जठारपेठ अकोला येथे बाल शिवाजी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव व प्रमुख पाहुणे  मा. अक्षय भाऊराव राऊत 

Read more

बाल शिवाजी शाळेत  ‘आविष्कार’ स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न 

ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी शाळेत  ‘आविष्कार’ स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव,संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ.अनघा देव,  बाल  शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका  सौ. किर्ती चोपडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सकाळच्या सत्राची सुरुवात ‘या रे या सारे या  ……’ ह्या गणपती बाप्पाच्या गाण्याने झाली. फुलवाडी ते तिसरी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची

Read more

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ ज्ञानार्जनासाठी करावा – श्री. अविनाश देव 

जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत ७५ वा प्रजासत्ताक दिन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीताने उपस्थित सर्वांनी तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन सौ.अंजली शेटे यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी ‘आम्हा देशाचा अभिमान ‘ हे समूहगीत सादर केले.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मीना काळे यांनी केले.  वर्ग ७ वी च्या विद्यार्थ्यांच्या लेझिम पथकाने उत्कृष्ट सादरीकरण केले.  संविधानाचे महत्त्व

Read more

येणाऱ्या संकटांना पाठ न फिरवता धैर्यानेसामना करावा व स्वामीजींचे व जिजाऊंचे प्रेरणादायी विचार आचरणात आणा. – सौ. वैशाली देशपांडे  

आज दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी स्थानिक जठारपेठ येथील बाल शिवाजी शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.  याप्रसंगी  प्रमुख अतिथी संस्थेच्या सहसचिव सौ. वैशाली देशपांडे ह्या लाभल्या होत्या.  कार्यक्रमाचे अध्यक्ष पद वर्ग ९ च्या समृद्धी काळंके हिने भूषविले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. किरण झटाले यांनी केले. सर्वप्रथम समर्थ मांडेकर याने कवितेतून जिजाऊंना वंदन

Read more

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताच्या क्षेत्रातील अनमोल योगदानाचे स्मरण करण्यासाठी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.  गणिताचे महत्त्व समजणे व गणिताविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड व कुतूहल निर्माण होण्यासाठी शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. वर्ग १

Read more

डॉ.  होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे  सुयश 

 मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा वर्ग ६ व ९ साठी घेण्यात येते. ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक व प्रकल्प सादरीकरण अशा तीन स्तरावर घेण्यात येते.  डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा २०२३-२४ मध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे.या स्पर्धेच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या दुसऱ्या फेरीसाठी वर्ग ६ वी ची निर्मिती संतोष हाडोळे, अर्णव रविंद्र भांबेरे, अंशुमन धनंजय धोत्रे, अधिराज मंगेश मुरूमकार, जय

Read more

सामूहिक अथर्वशीर्षाचे पंचसहस्रावर्तन..

श्री गणेश चतुर्थीपासून दहा दिवस या गणेश पूजेचे सामर्थ्य खरोखरच अपूर्व आहे.  अशा मन व बुद्धीला शांत ठेवणाऱ्या अथर्वशीर्षाचे पठण भक्तीमय  वातावरणात  संपन्न झाले. गणेश उत्सवाचे औचित्य साधून  ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत मनाला प्रसन्न करणारे  अथर्वशीर्षाचे पंचसहस्रावर्तन करण्यात आले. सर्वप्रथम संस्थेचे  सचिव मा.श्री. गद्रे सर, शाळा समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी गणेश पूजन केले. श्री गणेश ही बुद्धीची देवता आहे. ओम गणेश शक्ती ही सदासर्वदा पुण्यकारक

Read more

पर्यावरण पूरक ‘ माझा गणपती ‘ उपक्रम संपन्न

स्थानिक जठारपेठ बाल शिवाजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या रक्षणाची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने शाळेत  शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन मंगळवार १२/ ९/ २०२३ रोजी करण्यात आले होते.  हा उपक्रम  शाळेच्या सहशिक्षिका सौ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमात वर्ग ५ ते ८ चे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.  यावेळी गणेश

Read more
1 2 3 4