माझी बाल शाळेच्या वतीने स्व. अण्णासाहेब देव स्मृतिप्रीत्यर्थ विविध स्पर्धांचे आयोजन

जठारपेठ येथील ब्राह्मण सभागृहात माझी बाल शाळेच्या वतीने स्व. अण्णासाहेब देव स्मृतिप्रीत्यर्थ विविध स्पर्धांचे आयोजन दि. २७ व २८ सप्टेंबर रोजी करण्यात आले. यंदा या उपक्रमाचे २८ वे वर्ष पूर्ण झाले असून, २४ शाळांमधील तब्बल ४६७ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धा अ, ब व क अशा तीन गटात घेण्यात आल्या. यामध्ये स्मरणशक्ती, चित्रकला, संस्कृत व मराठी कविता, इंग्रजी कविता,

Read more

स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय वादविवाद स्पर्धा ✅

बाल शिवाजी माध्यमिक शाळा, अकोला आणि कै. काकासाहेब ठोंबरे स्मृती सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने वीर सावरकर सभागृहात वादविवाद स्पर्धा पार पडली.विषय होता — “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर भारत खऱ्या अर्थाने डिजिटल झाला आहे !” या स्पर्धेत अकोल्यातील 9 शाळांचे चमू सहभागी झाले.🏆 विजेतेपद : बाल शिवाजी माध्यमिक शाळा (आनंदी योगेश सरप, सुप्रिया नवीनकुमार देशमुख)🥈 द्वितीय क्रमांक : प्रभात किड्स, अकोला

Read more

बॅडमिंटन स्पर्धेत वर्ग 9 चा जयंत राजेश पाचपोर व वर्ग 7 चा आर्यन प्रशांत शिंदे यांची विभागीय स्पर्धेत निवड दोघांचेही खूप खूप अभिनंदन…

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत वर्ग 9 चा जयंत राजेश पाचपोर व वर्ग 7 चा आर्यन प्रशांत शिंदे यांची विभागीय स्पर्धेत निवड दोघांचेही खूप खूप अभिनंदन…

Read more

जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत वर्ग 9 वीची वेदश्री योगेश गोतमारे हिने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय निवड.. हार्दिक अभिनंदन

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत वर्ग 9 वीची वेदश्री योगेश गोतमारे हिने प्रथम क्रमांक पटकावून राज्यस्तरीय निवड.. हार्दिक अभिनंदन

Read more

अभिनंदन चि. स्वराज समीर थोडगे! 🙏🌸

🎤 चिन्मय मिशन, अकोलाच्या वतीने आयोजित चिन्मय गीता पठण स्पर्धा – २०२५ 🎤 👑 बालगटात अकोल्यातील विविध शाळांच्या १८२ विद्यार्थ्यांचा सहभाग ✨ माझी बाल शाळेतील (के.जी.–१) चा विद्यार्थी चि. स्वराज समीर थोडगे  याने गीतेच्या १५ व्या अध्यायातील श्लोकांचे पठण करून 🏆 प्रथम उत्तेजनार्थ बक्षीस पटकावले! 💐 अभिनंदन स्वराज!💐

Read more

बाल शिवाजी शाळेत सखी सावित्री समिती अंतर्गत समुपदेशन कार्यशाळा

बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत सखी सावित्री समितीच्या वतीने किशोरवयीन विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अकोल्याच्या सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राधिका केळकर यांनी विद्यार्थ्यांना विचार, भावना व वर्तन यांचा परस्पर संबंध, मोबाईलचा दुरुपयोग व त्यावरील उपाय, ध्येय निर्धारण आणि आत्मशिस्त याबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमाचे पालक व उपस्थितांकडून विशेष कौतुक

Read more

राष्ट्रीय अंतरिक्ष दिवसानिमित्त शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजेते ठरलेल्या आणि इस्रो विज्ञान यात्रेसाठी निवड झालेल्या सौ.पूर्वा सोमण आणि सौ. शीतल थोडगे तसेच गिरिजा दळवी आणि अर्णव भांबेरे यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐💐💐💐💐

Read more

बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न

शिक्षकांचे कार्यप्रति असणारे समर्पण त्यांच्या भूमिकेत गेल्यानंतरच कळते या शब्दात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाला आपल्या भावना व्यक्त केल्या स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी शालेय व्यवस्थापन व अध्यापन कार्य स्वयंशासन या उपक्रमांतर्गत उत्तम रीतीने पार पाडले शिक्षकां प्रतिकृती व्यक्त करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ग दहावीचा

Read more

🌸✨ अथर्वशीर्ष पंच सहस्त्रवर्तन 🙏 ✨🌸

अकोला येथील बाल शिवाजी शाळेत ब्राह्मण सभा यांच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त अथर्वशीर्ष पंच सहस्त्रवर्तन उत्साहात पार पडले. 🎶 शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगिता जळमकर, सचिव मोहन गद्रे व कीर्ती चोपडे यांच्या हस्ते गणेश पूजन करण्यात आले. यावेळी शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी तन्मयतेने सामूहिक पठण केले. शेवटी गणपतीची आरती व “गणपती बाप्पा मोरया” जयघोषाने वातावरण भक्तिमय झाले. 🙌✨

Read more

जलतरण स्पर्धेत विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड

अकोला येथे क्रीडा व युवकसेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत शिवराज योगेश सरप व आनंद बजरंग गावंडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विभागीय स्तरासाठी निवड मिळवली आहे. या यशामागे त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे मोलाचे योगदान असून त्यांच्या मेहनतीचे कौतुक करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांचे शाळा परिवाराने अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read more
1 2 3 4 5 6 10