बाल शिवाजी शाळेत शिक्षिका सक्षमीकरण कार्यशाळा……

दिनांक 22 /10/ 2024 मंगळवार रोजी स्व.अण्णासाहेब देव सभागृह येथे सकाळी 11 ते 12.30 या वेळेत वर्ग बालगट ते 10 वी पर्यंतच्या शिक्षीकांकरिता श्री. नरेंद्र देशपांडे सरांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन सौ.भारती कुलकर्णी यांनी केले. सर्वप्रथम मान्यवरांचे स्वागत करून प्रमुख अतिथीचा परिचय करून दिला. त्यानंतर श्री. नरेंद्र देशपांडे सरांनी मार्गदर्शनास सुरुवात केली. अध्ययन अध्यापन कार्य अधिक प्रभावी

Read more

बाल शिवाजी शाळेत परिवहन समिती सभा संपन्न..

दिनांक 10 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी बाल शिवाजी शाळेत परिवहन समिती सभा स्थापन करण्यात आली. परिवहन समिती साठी आवश्यक असलेल्या सदस्यांना आमंत्रित करण्यात आले. त्यामध्ये पोलीस वाहन निरीक्षक श्री.मनोज शेळके, पोलीस उपनिरीक्षक वाहतूक शाखा श्री. जयवंत शिंदे तसेच शिक्षण केंद्रप्रमुख श्री. गोपाल सुरे, शाळा शिक्षक पालक संघ प्रतिनिधी श्री. विनोद इंगळे, श्री. दिनेश पांडव तसेच श्री. निलेश देव, वाहन चालक

Read more

बाल शिवाजी शाळेत महिषासुरमर्दिनी स्तोत्र सामूहिक पठण….

दिनांक ०५/१०/२०२४ रोजी दरवर्षीप्रमाणे यंदाही महिषासुरमर्दिनी स्तोत्राचे सामूहिक पठण करण्यात आले. भारतीय संस्कृतीत मातृशक्तीला पवित्र स्थान आहे. देवी भगवती दुर्गा ही साक्षात शक्ती रूपात सर्वत्र स्थित आहे. दुर्गेच्या या शक्ति रूपांचे सर्व स्त्री-पुरुषांमध्ये अधिष्ठान असतेच. केवळ या शक्तीचा योग्य ठिकाणी योग्य वापर करणे, संयमतून नियंत्रण मिळवणे हेच खरे नवरात्री पूजन होय. दुर्गेचे रूप केवळ बघण्यासाठी नव्हे तर आत्मसात करण्यासाठी आहे.

Read more

बाल शिवाजी शाळेत सखी सावित्री समिती अंतर्गत किशोरवयीन विद्यार्थ्यांचे समुपदेशन….

दि.04/10/2024  मंगळवार रोजी सकाळी 9 वाजता शाळेतील सभागृहात सखी सावित्री समितीची तिसरी सभा आयोजित करण्यात आली होती या सभेत सर्व सभासद उपस्थित होते या सभेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली.सभेमध्ये शाळेतील इयत्ता 5 वी ते 10 वी मधील विद्यार्थी हे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वावरत आहे. मोबाईल इंटरनेट वेगवेगळ्या ॲप्स द्वारा नको ते विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टिक्षेपात पडतात. ज्या वयात योग्य संस्कार रुजवायला हवे, त्या वयात विद्यार्थी/मुले नको त्या प्रलोभनाला बळी पडतात

Read more

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वातंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी…..

राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वातंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री सुहास उदापूरकर सर लाभले होते.. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजनानी करणात आली. सर्वप्रथम कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती निष्ठा बंडावार हिने इंग्रजी भाषणातून सांगितली. तन्मय ताडे यांनी ‘भारतभूचे थोर सुपुत्र’ ही

Read more

बाल शिवाजी शाळेत शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा….

21/09/2024 शनिवार रोजी बाल शिवाजी प्राथमिक शाळेत अण्णासाहेब देव सभागृह येथे दुपारी 12.50 ते 3.10 मि. या वेळेत वर्ग बालगट ते 10 वी पर्यंतच्या सर्व शिक्षकांची प्रो. डॉ. मेघराज गाडगे सरांनी कार्यशाळा घेतली. प्रो. डॉ. घाडगे सरांनी शिक्षकांशी संवाद साधत मार्गदर्शनास सुरुवात केली PPT  च्या आधारे त्यांनी The art of technique (Pedagogy) अध्यापनशास्त्र याबाबत आदर्श शिक्षक कसा असावा? त्यांच्या अध्यापनात कोणते घटक असावे? आपले अध्यापन प्रभावी कसे करावे? शिक्षण आणि विद्यार्थ्यांचे नाते कसे असावे? वर्गातील

Read more

बाल शिवाजी शाळेत सामूहिक अथर्वशीर्षाचे चतु:सहस्त्रवर्तन !

दिनांक १६/०९/२०२४ रोजी गणेशोत्सवाचे औचित्य साधून ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत मनाला प्रसन्न करणाऱ्या अथर्वशीर्षाचे चतु:सहस्त्रवर्तन करण्यात आले.गणपती ही बुद्धी ची देवता आहे .चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणपतीची आराधना करण्यासाठी,बुद्धीला स्थिरता येण्यासाठी योजिलेले उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय.सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आदर्श विद्यार्थी घडावेत यासाठी दर वर्षी शाळेत अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले जाते.  संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव,संस्थेचे

Read more

बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

दिनांक ०५/०९/२०२४ रोजी स्थानिक बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, सौ. कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन हा कार्यक्रम राबवला व त्यानंतर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.

Read more

बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत बालसंसद निवडणुकीचे यशस्वी आयोजन

दिनांक ०७/०८/२०२४ रोजी नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्या त्यामुळे निवडणुकीबद्दल मुलांच्या मनात कुतूहल होते शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची ओळख व्हावी या उद्देशाने जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत बाल संसद निवडणुकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.निवडणुकीचा प्रचार कसा करावा, बॅलेट पेपर कसा असतो, मतदान कक्ष,मतदार यादी,आचारसंहिता म्हणजे काय? प्रत्यक्ष मतदान कसे करायचे,ईव्हीएम मशीन वर मतदान कसे केले जाते या

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्साहात संपन्न–

दिनांक 26/08/2024 रोजी शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे संचलन वर्ग तिसरीच्या विद्यार्थिनी श्रावणी  नावकार व आनंदी कुलकर्णी यांनी केले. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या मा.शैलजा विजय अंधारे  यांचे स्वागत ओजस्वी देशमुख हिने पुष्प देऊन केले. सर्वप्रथम आज ‘गोकुळात रंग खेळतो हरी’ही गवळण सादर करण्यात आली. त्यानंतर पर्यावरण हा सजीवांसाठी अनमोल ठेवा असल्याने तो

Read more
1 2 3 4