सामूहिक  अथर्वशीर्षाचे पंचसहस्रावर्तन  संपन्न

पवित्र व प्रसन्न वातावरण निर्माण करणारे सामूहिक अथर्वशीर्षाचे पंचसहस्रावर्तनसंपन्न …..   ‘त्वमेव केवलं कर्तासि ‘  असे म्हणत अहंकाराची ज्योत विझविणाऱ्या मन व बुद्धीला शांत ठेवणाऱ्या  अथर्वशीर्षाचे  पठण चैतन्यमय, भक्तीमय वातावरणात संपन्न झाले.  गणेश उत्सवाचे औचित्य साधून  ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत मनाला प्रसन्न करणारे  अथर्वशीर्षाचे  पंचसहस्रावर्तनकरण्यात आले. सर्वप्रथम संस्थेचे  सचिव मा.श्री. गद्रे सर,  शाळा समिती सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी गणेश पूजन केले. सर्व विद्या व कलांचे अधिष्ठान असलेल्या श्री गणेशाने हिंदू

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी, दहीहंडी उत्साहात संपन्न

जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे संचलन वर्ग ३ री च्या विद्यार्थिनी अन्वया निलेश पाकदुने व ऋग्वेदा अरविंद उगले यांनी केले. श्रीकृष्ण प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांचे स्वागत गार्गी पराग देशमुख  हिने पुष्प देऊन केले. सर्व प्रथम ‘श्री विष्णूंचे अवतार’ ही नाटिका सादर करण्यात आली.नाटिकेचे संचालन देवश्री दत्तात्रय कराळे आणि शाल्मली विवेक देशपांडे यांनी

Read more

पर्यावरण पूरक ‘ माझा गणपती ‘ उपक्रम संपन्न

स्थानिक जठारपेठ बाल शिवाजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या रक्षणाची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने शाळेत  शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन शनिवार 27/ 8/ 22 रोजी करण्यात आले होते.  हा उपक्रम शाळेच्या सहशिक्षिका सौ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमात वर्ग ५ ते ७ चे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.  यावेळी गणेश

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेत संस्कृत दिन तथा रक्षाबंधन उत्साहात संपन्न

‘आत्मविकासासाठी संस्कृत चा प्रसार करूया आणि ‘मम गृहं संस्कृत गृहं’ या उक्तिनुसार आपल्या दैनंदिन बोलण्यात संस्कृत चा उपयोग करूया ‘…   मा. सौ. जयश्री देशमुख ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी माध्यमिक शाळेत संस्कृत दिन तथा रक्षाबंधन उत्साहाने संपन्न झाला.  या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्कृत भारतीच्या नगर मंत्री मा. सौ. जयश्री देशमुख लाभल्या होत्या.  भाषा जननी गीर्वाण भारती असलेल्या संस्कृत भाषेची श्रेष्ठता दर्शविणारा कार्यक्रम

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी राबवला  प्लॅस्टिक  निर्मूलनाचा उत्कृष्ट उपक्रम

स्थानिक जठारपेठ परिसरातील ब्राहमण सभा संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळा  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कायम प्रयत्नशील असते तसेच नेहमीच विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी  राबवत असते. याच अनुषंगाने  प्लॅस्टिक  निर्मूलनाचे  महत्त्व लक्षात घेऊन  बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असा उपक्रम राबवला. वर्ग ८ वीच्या विद्यार्थ्यांनी केलेला ‘ प्लॅस्टिकमुक्त परिसर’ या संकल्पनेवर आधारित, पर्यावरणात घातक असलेल्या प्लॅस्टिक ला परिसरातून हद्दपार करण्यासाठी अतिशय स्तुत्य असा उपक्रम  वर्ग शिक्षिका सौ. रश्मी जोशी, सौ.

Read more

बाल शिवाजी शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

योग ही भारताची प्राचीन व वैभवशाली परंपरा आहे. योगशास्त्राचे महत्त्व संपूर्ण जगाने ओळखले असून आरोग्यासाठी योगाचे महत्व लक्षात घेता संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून  घोषित केला आहे.  शाळेत सातत्याने विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षण देऊन दरवर्षी हा दिवस साजरा केल्या जातो. योगा नियमित केल्यामुळे मन व शरिराकरिता कोणकोणते फायदे आहेत ते योगासने केल्यानंतरच समजू शकते. योगदिनाचे महत्त्व लक्षात घेऊन स्थानिक जठारपेठ परिसरातील ब्राहमण सभा संकुलांतर्गत  बाल

Read more

” भारतीय प्रथा परंपरांना वैज्ञानिक आधार आहे.  ” – मा.डॉ. श्री.हरीष मालपाणी
बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा 

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर मा. डॉ. हरीष  मालपाणी  विभागप्रमुख सूक्ष्मजीवशास्त्र विभाग आर.एल.टी. कॉलेज ऑफ सायन्स अकोला व कुतूहल संस्कार केंद्र अकोला चे संचालक डॉ. नितीन ओक सर, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब पाठक,  प्रा. उमा शिवाल मॅडम  व प्रा. शशीरेखा पारीका मॅडम उपस्थित होते.  डॉ. सी व्ही रमण व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने

Read more

बाल शिवाजी शाळेत शिवजयंती साजरी 

 हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बाल शिवाजी शाळेत साजरी करण्यात आली.  याप्रसंगी स्वराज्याचे शिलेदार असणाऱ्या मावळ्यांना मानाचा मुजरा म्हणून वर्ग ६ च्या विद्यार्थांनी ‘स्वराज्याचे शिलेदार ‘ हा कार्यक्रम सादर केला. त्यावेळी सार्थक सोमण याने कवी भूषण, सोहम खपली याने कोंडाजी फर्जंद, आराध्य जोशी -हिरोजी इंदुलकर, आयुष भिसे – बाजी पासलकर, ओम सोळंके – बहिर्जी नाईक, भार्गव राजूरकर

Read more

बाल शिवाजी शाळेत सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

    स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी  शाळेत ३ जानेवारी २०२२  सोमवार रोजी ‘बालिका दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतीज्योती  सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून मानवंदना देण्यात आली .  वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थिनींनी भारतीय प्रतिभावान स्त्री व्यक्तिमत्वाच्या वेशभूषा करून त्यांच्या कार्याची महती थोडक्यात सांगितली. तसेच वर्ग ५ ते ९ च्या  विद्यार्थ्यांनी वर्गात गटानुसार ‘सावित्रीबाई फुले जयंतीचा ‘ कार्यक्रम सादर

Read more

विज्ञान व जीवन यांची सांगड घालून विज्ञान विषय आत्मसात करा – मा. डॉ. सुचेता पाटेकर

‘ विज्ञान व जीवन यांची सांगड घालून विज्ञान विषयाचे  ज्ञान प्राप्त करावे  ‘ असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. डॉ. सुचेता पाटेकर यांनी स्थानिक बाल शिवाजी शाळेत २० डिसेंबर रोजी शालेयस्तरीय विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजन प्रसंगी केले.  प्रदर्शनीतील विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रतिकृतींचे त्यांनी अवलोकन करून कौतुक केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. डॉ. सुचेता पाटेकर या लाभल्या . तसेच विज्ञान पर्यवेक्षक मा. श्री. प्रमोद टेकाडे सर

Read more
1 2 3 4 12