बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत “एक विद्यार्थी – एक वही” उपक्रमास  उत्स्फूर्त प्रतिसाद

अकोला (प्रतिनिधी) : विद्या भारती विदर्भ तर्फे राबविण्यात आलेल्या “एक विद्यार्थी – एक वही” या उपक्रमात जठार पेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेने मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे शालेय विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. शिक्षणाविषयीची जाणीव आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच पालकांनी मनापासून सहभाग घेतला.

बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत “एक विद्यार्थी – एक वही” उपक्रमास  उत्स्फूर्त प्रतिसाद.

या उपक्रमांतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी मिळून वह्या, पेन, पेन्सिली, दप्तर आदी शालेय वस्तू देणगी म्हणून जमा केल्या. विद्यार्थ्यांनी स्वतःहून पुढाकार घेत इतर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी योगदान दिले.

शाळेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारणी सदस्य नरेंद्र देशपांडे, शाळा समिती सदस्य समीर थोडगे, प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग आणि पालकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.

समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी केलेले हे योगदान विद्यार्थ्यांमध्ये संवेदनशीलता आणि समाजसेवेची भावना दृढ करणारे ठरले.