प्लास्टिकचा अतिरेक टाळा आणि पर्यावरण वाचवा … श्री मिलिंद पगारे

प्लास्टिकचा अतिरेकी वापर वेळीच थांबवला नाही तर भविष्यात अतिशय गंभीर परिणामांना आपल्याला सामोरे जावे लागेल. त्यामुळे प्रत्येकाने अधिक जागरूक राहून प्लास्टिकचा वापर टाळा आणि स्वतःला आणि आपल्या पर्यावणाला वाचवा’ असे मत प्लास्टिक विरोधी चळवळ उभारणारे श्री मिलिंद पगारे यांनी स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत झालेल्या पर्यावरणपूरक कार्यक्रमात केले.

Read more

राज्य स्तरीय कॅरम स्पर्धेत निवड

क्रीडा युवक संचलनालय महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे आयोजित शालेय कॅरम क्रीडा स्पर्धेत बालशिवाजी माध्यमिक शाळा अकोला या शाळेची विद्यार्थिनी अमिता सुबाहु ठोसर ही यवतमाळ येथे झालेल्या विभागीय पातळीवरील कॅरम स्पर्धेत विजयी झाली असून, तिची राज्यस्तरीय स्पर्धे करिता निवड झाली आहे. राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धा २१ व २२ डिसेंबर रोजी नांदेड येथे संपन्न होत आहे. या मध्ये अमिता ठोसर ही अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व

Read more

बाल शिवाजीच्या बालवैज्ञानिकांची झेप

अकोला: मुंबई विज्ञान अध्यापक मंडळ आयोजित डॉ होमी भाभा ‘ बाल वैज्ञानिक व्हा ” या वर्ग ६ व ९ वी साठी घेतल्या जाणारया स्पर्धेत बाल शिवजी शाळेच्या पाच विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे . या स्पर्धेत सहभागी झालेले वर्ग ६ चे विद्यार्थी आदित्य प्रकाश चतरकर, नमस्वी शेगोकार तसेच वर्ग ९ वी चे यशराज प्रमोद तायडे , ओम राजेश पाटील व

Read more

मुलांना चुका करण्याचे स्वातंत्र्य द्या – मा. नरेंद्र लांजेवार

बाल शिवाजी शाळेत पालकांसाठी निबंध स्पर्ध आणि पारितोषिक वितरण समारंभ मुलांना चुका करण्याचे स्वातंत्र्य द्या. त्यांना केवळ पाठ्यपुस्तकातीलच नव्हे तर दैनंदिन जीवनातील गोष्टी शिकविणे आवश्यक आहे. मुले शिकतांना चुका करतील तरी त्यांना पुन्हा संधी द्या. असे विचार प्रसिद्ध वक्ते, लेखक व पालकत्व या विषयावरील तज्ञ श्री. नरेंद्र लांजेवार ग्रंथपाल , भारत विद्यालय बुलढाणा यांनी या प्रसंगी मांडले. “ आई बाबांशी

Read more

वाचन कसे करावे?

दिनांक २२ ते २५ ऑक्टोबर या काळात शिक्षिका सक्षमीकरणासाठी वेगवेगळ्या विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात  आल्या . यातील डॉ नितीन ओक यांनी वाचन कसे करावे या विषयावर सर्वांना मार्गदर्शन केले.

Read more

शैक्षणिक कार्यामध्ये स्वयंप्रेरणेने ज्ञानाची अद्यवतता साधने

‘शैक्षणिक कार्यामध्ये स्वयंप्रेरणेने ज्ञानाची अद्यवतता साधने ‘ कसे सहज शक्य आहे या विषयावर प्रसिद्ध विचारवंत व प्रखर वक्ते श्री विवेकजी घळसासी यांनी शिक्षिकांना नवीन दिशा दिली.

Read more

क्षेत्रभेट: विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

क्षेत्रभेट –  विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता विविध ठिकाणी क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले होते , त्यातून दैनंदिन व्यवहारातील अनुभव त्यांनी घेतले २३. अकोला जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित गणित संबोध परीक्षेत शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.

Read more

वाचन प्रेरणा दिन

भारताचे ११ वे राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात साजरा होणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाला शाळेतील विद्यार्थ्यांनी वाचन करून त्यांना आदरांजली वाहिली . त्याचे औचित्य साधून दिनांक १७ ते २२ ऑक्टोबर या काळात पालकांसाठी विशेष ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन केल्या गेले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमासाठी  शाळेतील शिक्षिका मेधा क्षीरसागर यांना   वाचनासाठी आमंत्रित केल्या गेले .

Read more

डोळ्यांची काळजी कशी घ्यावी: मार्गदर्शन

I .M. A. अकोला तर्फे   १३ ऑक्टोबर रोजी अकोल्यातील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञांनी जागतिक दृष्टी दिन चे औचित्त साधून डोळ्यांची काळजी कशी घ्यावी या बद्दल मार्गदर्शन केले .

Read more
1 8 9 10 11 12