माझी बाल शाळेत विविध स्पर्धा संपन्न….

दिनांक -28 व 29/09/2024 रविवार रोजी ब्राह्मण सभा अंतर्गतमाझी बाल शाळेने स्व. अण्णासाहेब देव स्मृती प्रित्यर्थ विविध स्पर्धांचे आयोजन केले होते.यंदा या स्पर्धेचे 27 वे वर्षे होते या स्पर्धा तीन गटात घेण्यात येतात.   यामध्ये अ व ब तसेच क या गटांचा समावेश असतो. अ व ब गटात अनुक्रमे स्मरणशक्ती,चित्रकला, संस्कृत,पाठांतर,मराठी कविता, व इंग्रजी कविता या स्पर्धा घेण्यात येतात. तसेच क गटात संस्कृतपाठांतर, बुद्धिबळ,सामान्यज्ञान, निबंध स्पर्धा यांचा समावेश असतो. यावर्षी 27 शाळांचे

Read more

बाल शिवाजी शाळेत पर्यावरण दिनानिमित्त इको क्लब स्थापन

विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षणाकरिता अभिवृत्ती विकसित करणे या उद्देशाने पर्यावरणदिनाचे औचित्य साधून शाळेत इको क्लब ची स्थापना करण्यात आली. यामध्ये इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या वृक्षमित्र विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इको क्लब मधील पर्यावरण स्नेही विद्यार्थी वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाची आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडतील.

Read more

‘आहार शरीरावरच नाही तर मनावरही परिणाम करतो’ — डॉ. दिशा पंडित  

आपल्या देशात वेदकालपासून योगपरंपरा सुरु आहे. व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक विकासासाठी योगाभ्यास खूप आवश्यक आहे. सध्याच्या धावपळीच्या, तणावपूर्ण, व्यस्त दिनचर्येत योग साधनेला वेळ देणे अत्यंत  गरजेचे झाले आहे.  संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून घोषित केल्यानुसार भारतात देखील  ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ साजरा केला जातो . आपल्या शाळेत देखील सातत्याने विद्यार्थ्यांमध्ये  योग प्रशिक्षणाद्वारे योगासनाचे महत्व रुजवले जाते.  योगदिनाचे महत्त्व लक्षात घेऊन

Read more

बाल शिवाजी शाळेच्या आजी आजोबा मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात आजी आजोबा मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्री. श्रीकांत पडगिलवार व सौ.गौरी पडगिलवार हे आजी आजोबा लाभले. सरस्वती पुजन व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात  करण्यात आली. यावेळी आदिनाथ सारंग सोमण याने मयुरेश्वर स्तोत्र सादर केले. तर वरदा विक्रांत कुळकर्णी  हिने गणेश अष्टोत्तरशतनाम स्तोत्र सादर केले.  मेळाव्यात सर्वप्रथम आजी आजोबांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्मरणशक्ती स्पर्धेत आजी सौ. सुनंदा  जवंजाळ आणि श्री. रामेश्वर पुंडकर

Read more

शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वची प्रेरणा भावी पिढीने घ्यावी –  मा.गायत्री देशमुख   

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्याने बाल शिवाजी शाळेत आयोजित कार्यक्रमात बोलताना ‘ शिवाजी महाराजांचे कर्तृत्व व कार्याची प्रेरणा भावी पिढीने घ्यावी. राष्ट्रहिताचा विचार करून देशकार्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेतसेचइतिहासातील गौरवशाली परंपरा असणाऱ्या गड, किल्ल्यांना विद्यार्थ्यांनी भेट द्यावी व महाराजांचा इतिहास जाणून घ्यावा  ‘ असे मार्गदर्शन मा. गायत्री देशमुख यांनी याप्रसंगी केले.       स्थानिक जठारपेठ अकोला येथे बाल शिवाजी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे अध्यक्ष

Read more

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

स्थानिक जठारपेठ स्थित  बाल शिवाजी शाळेत 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताच्या क्षेत्रातील अनमोल योगदानाचे स्मरण करण्यासाठी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो.  गणिताचे महत्त्व समजणे व गणिताविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड व कुतूहल निर्माण होण्यासाठी शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले. वर्ग १

Read more

    दोन बाल विज्ञान प्रकल्प  विभागीय स्तरावर 

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या वर्ग ६ च्या विद्यार्थ्यांचे  विज्ञान प्रकल्प विभागीय स्तरावर निवडण्यात आले आहेत.  भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे दरवर्षी  राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात येते.  २१ नोव्हेंबरला online  पद्धतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रकल्प सादरीकरणात एकूण ३२ प्रकल्पांचा समावेश होता. ३२ पैकी ६ प्रकल्पांची विभागीय स्तरावर निवड करण्यात आली. त्यामध्ये  बाल शिवाजी शाळेच्या २ प्रकल्पांची  विभागीय स्तरावर निवड

Read more

बाल शिवाजी शाळेत महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी  

जठारपेठ स्थित ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी प्राथमिक शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वतंत्र भारताचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम वर्ग ५ वी च्या विद्यार्थ्यांनी  सादर केला. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून एल.आर.टी. वाणिज्य  महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या सहयोगी शिक्षिका डॉ. स्वाती दामोदरे मॅडम लाभल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. या कार्यक्रमात निःस्पृह शास्त्रीजीं यांच्याबद्दल

Read more

बाल शिवाजी शाळेत स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे यशस्वी आयोजन 

‘ फक्त लेखी परीक्षाचं  मुलांच्या बुद्धिमत्तेचे किंवा सर्वांगिण विकासाचे मूल्यमापन करू शकतात ‘  या विषयावर  बाल शिवाजी शाळेत शाळेचे  संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा व स्वतःचे मत निर्भिडपणे व्यक्त करता यावे या हेतूने  स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धेचे हे १४ वे वर्ष आहे. सर्वप्रथम शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शहरातील

Read more

बाल शिवाजीच्या विद्यार्थ्यांनी घेतले स्वयं शासनाचे धडे 

स्थानिक बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  सावरकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य श्री नरेंद्र देशपांडे, शाळा समिती सदस्य डॉ. जयंत म्हैसने,  माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.  कीर्ती चोपडे, शाळेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.  वर्ग १० वी च्या विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली

Read more
1 2 3 12