बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत..

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे १२ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी  जिल्हास्तरीय  गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. वर्ग ५ च्या आयुष गजानन जळमकर  याने जिल्ह्यातून ३ रा येण्याचा मान मिळवला तर वर्ग ८ वी च्या भक्ती मनिष मेन हिने  जिल्ह्यातून  ५ वा येण्याचा मान मिळवला

Read more

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांची उत्तुंग भरारी

भारताच्या विज्ञान व तंत्रज्ञान शिक्षण प्रसार मंडळ व NCERT यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी विज्ञान मंथन २०२१ ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेत बाल शिवाजी शाळेतील संस्कृती विनायक पाठक (वर्ग ८ वा) जिल्ह्यातून प्रथम, ऋतुजा घोगरे   (वर्ग ८ वा)  जिल्ह्यातून व्दितीय, ओजस जोशी  (वर्ग १० वा ) जिल्ह्यातून प्रथम, मधुरा किडिले (वर्ग १० वा) जिल्ह्यातून  व्दितीय या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले

Read more

बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञा शोध शिष्यवृत्ती करीता पात्र

बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील सत्र २०१८-१९  मध्ये वर्ग  १० चे  प्रज्वल जगन्नाथ  घोगले आणि  हर्षल अमर गजभिये हे विद्यार्थी राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत शिष्यवृत्ती करीता पात्र ठरले आहेत. या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा बुधवार दिनांक १७-१२-२०२० रोजी  शिक्षणाधिकारी कार्यालयात पार पडला. याप्रसंगी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माननीय श्री. प्रकाश मुकुंद सर यांच्या शुभहस्ते प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यूट्यूब चॅनेल वर प्रसारित

Read more

बाल शिवाजी शाळेची माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तुंग भरारी

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घवघवीत यश प्राप्त केले असून  सलग १९ वर्षांपासून शाळेने १००% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत बाल शिवाजी शाळेने आपली उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवत ९० पैकी ९० विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत असून त्यापैकी ६२ विद्यार्थी ९०% च्या वर आहेत. जान्हवी दिनेश कोळमकर  हिने सर्वाधिक ९८.६० % गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा मान मिळवला. 

Read more

‘भगिरथ प्रयत्न करून संस्कृत गंगा घरा घरापर्यंत पोहचवा ‘ ….. डॉ. राजेंद्र मेंडकी

ब्राह्मण सभांतर्गत बाल शिवाजी शाळेत संस्कृत दिन व रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र मेंडकी लाभले होते. तसेच संस्थेचे सचिव मा.श्री.मोहन गद्रे,शाळा समिती सदस्य,मुख्याध्यापिका, उपमुख्याध्यापिका,शिक्षकवृंद,पालकवृंद,विद्यार्थीवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अनिकेत पाटखेडकर याने केले. सरस्वती पूजन व दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. अतिथींचे स्वागत बाल शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शोभा अग्रवाल यांनी केले. कार्यक्रमाचे

Read more

महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे सुयश…..

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र टॅलेंट सर्च जळगाव तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत तीन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकाविले आहे. वर्ग ४ च्या गार्गी आशुआल्हाद भावसार हिने २ रे स्थान,वर्ग ७ च्या नमस्वी नारायण शेगोकार हिने ३ रे तर वर्ग ६च्या मधुरा प्रदीप किडीले हिने

Read more

बाल शिवाजी शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात येणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करून शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.पूर्व उच्च प्राथमिक परीक्षेत इयत्ता ५ वी चे १९ विद्यार्थी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता ८ वी चे १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. वर्ग ५ च्या भक्ती मेन हिने

Read more

बाल शिवाजी शाळेची माध्यमिक शालांत परीक्षेत उत्तुंग भरारी

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दरवर्षी प्रमाणे या वर्षीही घवघवीत यश प्राप्त केले असून शाळेच्या निकाल १००% लागला आहे. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत बाल शिवाजी शाळेने आपली परंपरा कायम ठेवत ९५ पैकी ८२ विद्यार्थी प्राविण्य श्रेणी त्यापैकी ५२ विद्यार्थी ९०% च्या वर आहेत. अमित संजय घाटोळ व यशराज प्रमोद

Read more

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेतील विदयार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केले.खंडेलवाल इंग्लिश स्कुल तर्फे आयोजित ‘Science Meet 2018’ मध्ये विविध स्पर्धांमध्ये बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात Science Quiz मध्ये वर्ग ४च्या सक्षम श्रीहरी बेदरकर आणि संस्कृती विनायक पाठक यांच्या गटाने उत्कृष्ट सादरीकरण करत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांना प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक मिळाले तसेच शाळेला रनींग ट्रॉफी मिळाली

Read more
1 2 3 4