पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत आयुष गजानन जळमकर जिल्ह्यातून प्रथम क्रमांकावर……

व्यक्तिमत्व घडविणे, बुद्धिमत्ता वाढविणे!
महाराष्ट्र राज्य परिक्षा पुणे तर्फे मार्च 2024 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इ.पाचवी) व पूर्व माध्यमिक (इ.आठवी) शिष्यवृत्ती परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे एकूण 49 विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले असून ते शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन !
Read moreमॉडर्न एज्युकेशन सोसाइटी अंतर्गत वाडिया कॉलेज पुणे तर्फे आयोजित महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या एकूण २२ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे हार्द्दिक अभिनंदन !
Read moreएम. टी. एस. जळगांव यांच्या तर्फे 2023 – 24 या सत्रात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत स्थानिक बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून, अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या वर्षी ही 27 विद्यार्थ्यांनी राज्यातून गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.
Read moreविद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण करणे आणि पर्यावरण संरक्षणाकरिता अभिवृत्ती विकसित करणे या उद्देशाने पर्यावरणदिनाचे औचित्य साधून शाळेत इको क्लब ची स्थापना करण्यात आली. यामध्ये इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या वृक्षमित्र विद्यार्थ्यांचा समावेश आहे. इको क्लब मधील पर्यावरण स्नेही विद्यार्थी वर्षभर विविध उपक्रमांच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाची आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडतील.
Read moreस्थानिक जठारपेठ बाल शिवाजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाच्या रक्षणाची जागरूकता निर्माण व्हावी यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याच अनुषंगाने शाळेत शाडूच्या मातीपासून गणपती तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन शनिवार 27/ 8/ 22 रोजी करण्यात आले होते. हा उपक्रम शाळेच्या सहशिक्षिका सौ. वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या उपक्रमात वर्ग ५ ते ७ चे विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी गणेश
Read moreआपल्या शाळेतील वर्ग ६ची विद्यार्थिनी राजवी विजय महाजन हिचे रविवार दि. १२/१२/२०२१ रोजी दुःखद निधन झाले आहे. तिला बाल शिवाजी परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
Read moreब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी शाळेतील शिक्षिका सौ. नयना जोशी. सौ. अंजली दिवेकर, सौ. शीतल थोडगे, सौ. अरुणा नावकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव यांनी आपल्या मार्गदर्शनात सर्व शिक्षिकांनी ‘ऑनलाईन
Read moreएम टी एस जळगांव यांच्या तर्फे २०२०-२०२१ या सत्रात घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत स्थानिक बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. वर्ग ७ वी ची संस्कृती विनायक पाठक हिने अकोला केंद्रातून प्रथम क्रमांक व राज्यातून व्दितीय क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच या परीक्षेत अकोला केंद्रातून वर्ग २ री तील प्रथमेश दिनेश भटकर प्रथम क्रमांक, वरदा विक्रांत कुळकर्णी व्दितीय क्रमांक, सर्वस्वी
Read moreस्थानिक जठारपेठ येथील बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे. वाडिया कॉलेज ,पुणे यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा सत्र २०१९-२० मध्ये वर्ग ८ वी तील जिल्हा स्तरीय गुणवत्ता यादीत मधुरा प्रदीप किडीले हिने प्रथम स्थान, स्वरांजली शिरीष कडू हिने दुसरे, ओजस श्रीकांत जोशी याने तिसरे तर क्षितिजा पंकज देशमुख हिने चौथे स्थान पटकाविले आहे. तर श्रीनिधी संदीप
Read more