दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी ब्राह्मण सभा अंतर्गत बालशिवाजी शाळेमध्ये संस्कृत दिन

संस्कृत भाषा ही भारतीय संस्कृतीचा गाभा आहे असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्कुत भारती अकोला नगराच्या पत्राचार विभाग प्रमुख माननीय सौ. आर्यप्रभा काळे या लाभल्या होत्या. दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सौ. रेणुका भाले यांनी प्रास्ताविक सादर केले त्यानंतर वर्ग आठवीच्या विद्यार्थ्यांनी समूहगीताद्वारे सरस्वती वंदना सादर केली प्रज्ञा भारती, श्री. भा. वर्णेकर यांचे

Read more

बाल शिवाजी शाळेत  78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात!

ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला. माध्यमिक शालांत 2023 परीक्षेत शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त करणारी अदिती ज्ञानेश्वर तराळे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यदिनी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव सर यांनी ‘विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही सहजतेने कुठलीही गोष्ट मिळत नाही, खरंच आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर सध्या

Read more

बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण सप्ताह उत्साहात साजरा…

 बाल शिवाजी शाळेत शिक्षण विभागातर्फे आयोजित  ‘शिक्षण सप्ताहाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी दिनांक 22 जुलै 2024 अध्ययन अध्यापन साहित्य दिवस हा  उपक्रम विद्यार्थी शिक्षकांनी  वर्गावर्गातून शैक्षणिक साहित्य तयार करून त्या पद्धतीने अध्ययन अध्यापन दिवस राबवला. तसेच  दिनांक 23 जुलै 2024 मूलभूत संख्या ज्ञान व साक्षरता दिवस अंतर्गत विविध गणितीय कोडी ,गणितीय प्रश्नमंजुषा, गणितीय खेळ वर्गांतून घेण्यात आले . दिनांक

Read more

बाल शिवाजी शाळेत महावाचन उत्सव -2024 उत्साहात साजरा…..

29 जुलै 2024 रोजी ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत महावाचन उत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री. श्याम राऊत सर व केंद्रप्रमुख श्री. गोपाल सुरे सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून स्थान भूषविले. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या पुस्तकांचे वाचन याप्रसंगी केले. त्यानंतर केंद्रप्रमुख श्री. गोपाल सुरे सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना

Read more

बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा पर्यावरण संरक्षण उपक्रम

दिनांक 30/07/2024 रोजी पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमांतर्गत डॉ. श्री. हर्षवर्धन देशमुख यांची कार्यशाळा विद्यार्थी व पालकांच्या  उपस्थितीत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आली.

Read more

बाल शिवाजी शाळेत आषाढीचा उत्साह….

दिनांक 18/07/2024 रोजी बाल शिवाजी शाळेत आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी आषाढी पर्वाला बाल वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात रंगले होते. विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा करून आले होते. विठ्ठलाची वेशभूषा आरव राहूल भालतिलक आणि रखुमाईची वेशभूषा मोक्षदा कुशल सेनाड हिने केली. बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ या गजरात टाळ वाजवत विद्यार्थ्यांनी दिंडी काढली.

Read more

बाल शिवाजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

दिनांक 01/07/2024 रोजी बाल शिवाजी प्राथमिक शाळेत, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक सत्रा नुसार 1 जुलै सोमवार रोजी शाळेच्या प्रथम दिनी बालगटाच्या व वर्ग पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सर्व शिक्षिकांनी हर्षोल्हासात  विद्यार्थ्यांचे औक्षण करून फुले देऊन स्वागत केले. शाळेच्या चिमुकल्यांनी फुले घेऊन बँड च्या तालावर आनंद पूर्ण वातावरणात शाळेत प्रवेश केला. प्रथम

Read more

बाल शिवाजी शाळेत जागतिक योगदिन उत्साहात साजरा..

ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत 21 जून 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी 25 वर्षापासून युवक करण्यात असलेले योग शिक्षक माननीय श्री अरविंद ज्योध यांनी अध्यक्षस्थान भूषविले. सरस्वती पूजन व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली कार्यक्रमाचे संचालन श्रीदत्त ठाकरे यांनी केले तर योगा विषयीची माहिती ईश्वरी खोले हिने उत्तमरीत्या सांगितले. प्राजक्ता सांबारे हिने योगा व्यास केल्याने

Read more

बाल शिवाजी शाळेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम….

बाल शिवाजी शाळेतील दहावीच्या 74 पैकी 71 विद्यार्थ्यांनी प्राविण्यश्रेणी प्राप्त केली आहे त्यापैकी 48 विद्यार्थी 90% त्यावर आहे तर शाळेतील शेवटचा विद्यार्थी 63% गुण म्हणजेच प्रथम श्रेणी प्राप्त करून उत्तीर्ण झाला आहे या घवकवी देशासाठी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांची मनःपूर्वक अभिनंदन!

Read more

बाल शिवाजी शाळेत मुक्तछंद उन्हाळी शिबिराचे आयोजन

दिनांक -22/04/2024 पासून  बाल शिवाजी शाळेत मुक्तछंद उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबीराचे उदघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे टिचर व संगीता जळमकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. 11 दिवसांचे हे मुक्तछंद शिबीर अतिशय आनंदात व जल्लोषात पार पडले. या शिबिरात वर्ग KG -1 ते चौथीपर्यंतचे एकूण 170 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांना या शिबिरात विविध हस्तकला, क्राफ्ट, चित्रकला

Read more
1 2 3 4