बाल शिवाजी प्राथमिक शाळेत पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव

बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ येथे 23 जून 2025 रोजी नवीन शैक्षणिक वर्षाच्या स्वागतार्थ पर्यावरणपूरक प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे टाळ्यांच्या गजरात, फुलांनी व ओवाळून स्वागत करण्यात आले. शाळा फुगे, रांगोळ्या व स्वागतद्वाराने सजवण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. रांगोळीत ‘ॐ’ काढून विद्यार्थ्यांनी सरस्वतीचे आशीर्वाद घेतले. Adop Tree Foundation मार्फत रोपांचे वाटप करण्यात आले. शाळेचे सचिव श्री. मोहन

Read more

नियमित योगसाधने द्वारे विद्यार्थ्यांनी स्व विकास साधावा.सौ. मनीषा नाईक

ब्राह्मण सभा अंतर्गत बालशिवाजी माध्यमिक शाळेत 21 जून रोजी योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते 25 वर्षांपासून योगाभ्यासाचे धडे देणाऱ्या सौ.मनीषा नाईक मॅडम अध्यक्षस्थानी होत्या.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आली.वर्ग दहावीची विद्यार्थिनी अदिती शंकर पाटील हिने ओंकार साधनेचे महत्त्व आपल्या भाषणातून विशद केले, तर आरोही राहुल महाशब्दे हिने वर्ग 10 वी साठी आयोजित योगवर्गाबद्दलचे मनोगत व्यक्त केले. यानंतर

Read more

विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे – मधुरा ठोंबरे – कुळकर्णी

बालशिवाजी माध्यमिक शाळेला माजी विद्यार्थिनी मधुरा ठोंबरे कुळकर्णी हिने भेट दिली.L.L.B.,L.L.M. ह्या कायद्याच्या पदव्या संपादन केलेली मधुरा  सध्या नवरचना विद्यापीठ,बडोदा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. व International  law या विषयात P.hd. करते आहे.यावेळी तिने वर्ग  नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांची संवाद साधला व त्यांना करिअर निवडी विषयक मार्गदर्शन केले. कला ,वाणिज्य व विज्ञान शाखांमधील विविध अभ्यासक्रमांची माहिती तिने विद्यार्थ्यांना यावेळी दिली

Read more

अकोला जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या गणित संबोध  व गणित प्रज्ञा परीक्षा 2024-25 मध्ये बाल शिवाजी शाळेचे उज्वल यश…..

 अकोला जिल्हा गणित अध्यापक मंडळ, अकोला यांच्या वतीने आयोजित गणित संबोध परीक्षा 2024-25 मध्ये बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी अत्यंत उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा गौरव वाढविला आहे. या परीक्षेमध्ये इयत्ता पाचवीतील तन्मय सचिन ताडे याने अकोला शहरातून प्रथम क्रमांक मिळवून सर्वांच्या कौतुकास पात्र ठरला. त्याचप्रमाणे इयत्ता आठवीतील ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के हिने देखील प्रथम क्रमांक पटकावला आहे. लावण्या ललित

Read more

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी डॉ. सी. व्ही. रमण बालवैज्ञानिक परीक्षेत नेत्रदीपक यश मिळवले आहे…..

इयत्ता 8 वी तील अर्णव रवींद्र भांबेरे याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत 100 पैकी 100 गुण मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला. इयत्ता 8 वी तील राजस्वी नारायण शेगोकार हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. तसेच ऐश्वर्या महेंद्र कोलटक्के हिने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिकांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव,

Read more

दि. 01/03/2025 रोजी अहिल्यादेवी महिला व शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला यांच्या पुढाकाराने मा. जिल्हाधिकारी कार्यालय अकोला येथील नियोजन भवन येथे झाली असून स्थानिक 35 शाळांचे विद्यार्थी आणि शिक्षक यात सहभाग आहेत. परिषदेमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शन, शास्त्रीय सादरीकरणे आणि चर्चासत्रे आयोजित केले.

अकोला शहर व परिसरातील पर्यावरण समस्यांचे सखोल अध्ययन करून त्यावर ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने आयोजित “पर्यावरण परिषद २०२५” संदर्भात पत्रकार परिषद घेतली गेली. या परिषदेमध्ये विद्यार्थी पर्यावरण प्रदूषणाचे विविध घटक अभ्यासून त्यावर चर्चा करण्यात आणि ठोस निर्णय घेतले जातील परिषदेमध्ये वायू, जल, आणि घनकचरा प्रदूषणासह जैवविविधता संवर्धन, प्लास्टिक टाळणी, पुनर्वापर आणि निसर्गस्नेही जीवनशैली यावर भर दिला आहे. विद्यार्थी विविध प्रयोग,

Read more

बाल शिवाजी शाळेच्या शिरपेचात आणखी एक हजेरी…चि. अर्णव भांबेरे अकोला विद्यार्थी विज्ञान मंथन परीक्षेत भारतातून दुसरा…

बाल शिवाजी शाळेतील इयत्ता 7 वीचा विद्यार्थी अर्णव रवींद्र भांबेरे याने विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) या राष्ट्रीय पातळीवरील विज्ञान परीक्षेत संपूर्ण भारतातून दुसरा क्रमांक मिळवून अकोल्याचा आणि महाराष्ट्राचा नावलौकिक देशपातळीवर पोहोचवला आहे. विशेष म्हणजे अर्णव हा हिमालयन मानांकन प्राप्त करणारा विदर्भातील पहिला विद्यार्थी ठरला आहे. या यशामुळे त्याची निवड ISRO (इस्रो)च्या बाल वैज्ञानिक सदस्यत्वासाठी करण्यात आली असून, त्याला वर्षभरात ISRO

Read more

बाल शिवाजीच्या बाल वैज्ञानिकांची यशोभरारी!!!

बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक महामंडळातर्फे 2024 – 25 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित डॉ. होमी भाभा ‘बाल वैज्ञानिक व्हा’ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या इयत्ता 9 वी चा आयुष गजानन जळमकर व इयत्ता 6 वी चा श्रीयश विनायक पाठक यांनी रौप्य पदक पटकावून बाल शिवाजी शाळेच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला आहे. आयुष, श्रीयश व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षिकांचे

Read more

बाल शिवाजी शाळेत मुक्तछंद उन्हाळी शिबिर जल्लोषात संपन्न!!!!

बाल शिवाजी शाळेत मुक्तछंद उन्हाळी शिबिराचे आयोजन दिनांक 14 ते 24 एप्रिल 2025 दरम्यान करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, पर्यवेक्षिका रागिणी बक्षी, किरण मुरूमकार,  भारती कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. दहा दिवसाची हे शिबीर अतिशय आनंदात व जल्लोषात पार पडले. या शिबिरात केजी 1 ते वर्ग 4 थी

Read more

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित

शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडियो निर्मिती स्पर्धा 2023 स्पर्धेत सौ.अपेक्षा योगेश आवळे यांचा 6 ते 8 या गटातून सामाजिक शास्त्र या विषयात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक व 9 ते 10 या गटातून सामाजिक शास्त्र या विषयात तालुकास्तरावर प्रथम क्रमांकमा. शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदानआवळे टीचर यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 🌹🌹👏🏻👏🏻👏🏻💐💐

Read more
1 5 6 7 8 9 13