विद्यार्थ्यांकडून शिक्षिकांना मिळाला चंद्रग्रहण दर्शनाचा आनंद!

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा जठारपेठ अंतर्गत स्थापित आर्यभट्ट खगोल मंडळातर्फे 3 मार्च रोजी खग्रास चंद्रग्रहणाच्या निमित्ताने काल विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नेहमीच शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते; मात्र वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे या उपक्रमात खगोल मंडळातील विद्यार्थ्यांनी शिक्षिकांसाठी उपक्रमाचे आयोजन केले होते. त्यांनी स्वतः टेलिस्कोप हाताळून प्रत्यक्ष चंद्रग्रहण बघण्याचा आनंद शिक्षिकांना दिला. या खगोल मंडळाचे

Read more

🏫मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा….

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळा, जठारपेठ, अकोला. येथे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वर्ग १ ते ९ पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध शालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल अभिमान व प्रेम निर्माण झाले. स्पर्धांचा तपशील पुढीलप्रमाणे — 🔹वर्ग पहिली –‘जीवेची वळकटी’ स्पर्धा 🔹वर्ग दुसरी –हस्ताक्षर स्पर्धा 🔹वर्ग तिसरी – मुळाक्षरांवरून जास्तीत जास्त शब्दलेखन स्पर्धा 🔹वर्ग चौथी – ‘ओळखा

Read more

डॉ. नितीन ओक आणि आर्यभट्ट खगोल मंडळातील खगोल प्रेमी विद्यार्थ्यांनी अनुभवली गुरु ग्रहाची जादुई दुनिया…

दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेत आर्यभट्ट खगोल मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष खगोल निरीक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रख्यात खगोल अभ्यासक डॉ. नितीन ओक यांच्या मार्गदर्शनात गुरु (Jupiter) ग्रह व त्याचे चार प्रमुख उपग्रह यांचे दुर्बिणीतून प्रत्यक्ष दर्शन घेण्याची संधी मिळाली. डॉ. नितीन ओक यांनी विद्यार्थ्यांना गुरु ग्रहाचा प्रचंड आकार, त्यावरील वादळी पट्टे,

Read more

बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

ब्राह्मण सभा अकोला संचालित बाल शिवाजी शाळेत ‘आविष्कार’ वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. संस्थेचे अध्यक्ष अविनाश देव, सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य अनघा देव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.विद्यार्थ्यांनी सादर केलेली नृत्ये, इंग्रजी व मराठी नाटिका यांना उपस्थितांची भरभरून दाद मिळाली. दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

Read more

बाल शिवाजी शाळेत विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक संपन्न……

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत दि. 30/12/2025 सोमवार रोजी बाल शिवाजी स्वा. सावरकर सभागृहात विद्यार्थी सुरक्षा समितीची बैठक उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सभेस पोलीस निरीक्षक, सिव्हिल लाईन, मा. मालती कायटे मॅडम प्रमुख वक्त्या व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी व उद्बोधनकर्त्या म्हणून लाभलेल्या मा. मालती कायटे मॅडम

Read more

बाल शिवाजी शाळेत सामूहिक अथर्वशीर्षाचे चतु:सहस्त्रवर्तन !

दिनांक १६/०९/२०२४ रोजी गणेशोत्सवाचे औचित्य साधून ब्राह्मण सभा अंतर्गत बाल शिवाजी शाळेत मनाला प्रसन्न करणाऱ्या अथर्वशीर्षाचे चतु:सहस्त्रवर्तन करण्यात आले.गणपती ही बुद्धी ची देवता आहे .चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या श्री गणपतीची आराधना करण्यासाठी,बुद्धीला स्थिरता येण्यासाठी योजिलेले उपनिषद म्हणजे अथर्वशीर्ष होय.सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून आदर्श विद्यार्थी घडावेत यासाठी दर वर्षी शाळेत अथर्वशीर्षाचे सामूहिक पठण केले जाते.  संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव,संस्थेचे

Read more

बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा

दिनांक ०५/०९/२०२४ रोजी स्थानिक बाल शिवाजी शाळेत शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सावरकर सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, सौ. कीर्ती चोपडे व शाळेतील सर्व शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते. शिक्षक दिनानिमित्त वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी स्वयंशासन हा कार्यक्रम राबवला व त्यानंतर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ.

Read more

बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत बालसंसद निवडणुकीचे यशस्वी आयोजन

दिनांक ०७/०८/२०२४ रोजी नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका पार पाडल्या त्यामुळे निवडणुकीबद्दल मुलांच्या मनात कुतूहल होते शालेय विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची ओळख व्हावी या उद्देशाने जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत बाल संसद निवडणुकीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.निवडणुकीचा प्रचार कसा करावा, बॅलेट पेपर कसा असतो, मतदान कक्ष,मतदार यादी,आचारसंहिता म्हणजे काय? प्रत्यक्ष मतदान कसे करायचे,ईव्हीएम मशीन वर मतदान कसे केले जाते या

Read more

बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा पर्यावरण संरक्षण उपक्रम

दिनांक 30/07/2024 रोजी पर्यावरण संरक्षणाच्या उपक्रमांतर्गत डॉ. श्री. हर्षवर्धन देशमुख यांची कार्यशाळा विद्यार्थी व पालकांच्या  उपस्थितीत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळेत आयोजित करण्यात आली.

Read more

बाल शिवाजी शाळेत आषाढीचा उत्साह….

दिनांक 18/07/2024 रोजी बाल शिवाजी शाळेत आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी आषाढी पर्वाला बाल वारकरी विठ्ठल नामाच्या गजरात रंगले होते. विद्यार्थी वारकऱ्यांची वेशभूषा करून आले होते. विठ्ठलाची वेशभूषा आरव राहूल भालतिलक आणि रखुमाईची वेशभूषा मोक्षदा कुशल सेनाड हिने केली. बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात ‘जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल’ या गजरात टाळ वाजवत विद्यार्थ्यांनी दिंडी काढली.

Read more
1 2