” भारताने पुरातन काळापासून विज्ञान व अध्यात्म यांची सांगड घातली आहे.  ” – मा.श्री. कुशल सेनाड  

बाल शिवाजी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी व्यासपीठावर मा. श्री. कुशल सेनाड  (HOD Science and Technology wing, श्री. चिमणलालजी भरतीया विद्यालय,अकोला), ब्राहमण सभा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. अविनाश देव, संस्थेचे सचिव मा. श्री. मोहन गद्रे , कार्यकारिणी सदस्य मा. सौ. वैजयंती पाठक,बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर उपस्थित होत्या.  डॉ. सी व्ही रमण व कवी

Read more

बाल शिवाजी शाळेत स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे यशस्वी आयोजन 

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत संस्थेचेसंस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन  करण्यात आले.  या वक्तृत्व स्पर्धेसाठी ‘ भारत- काल, आज आणि उद्या ‘  हा विषय होता. या स्पर्धेचे परीक्षण  प्रा. डॉ. गजानन मालोकार व  सौ.  अश्विनी गोरे यांनी केले. सर्वप्रथम शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे यांनी केले. शहरातील १२ शाळेतील  विद्यार्थी

Read more

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शासकीय रेखाकला परीक्षेत सुयश

 अकोला स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेतील विदयार्थ्यांनी रेखाकला परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे. कला संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्राईंग ग्रेड परीक्षा २०२२ यात बाल शिवाजी माध्यमिक शाळेचा रोहन सचिन बोरसे वर्ग ९ वा हा एलीमेंटरी ड्राईंग परीक्षेत महाराष्ट्रातून ३८ वा मेरीट व ईश्वरी राजाराम  म्हैसने  ही इंटरमिजीएट ड्राईंग परीक्षेत महाराष्ट्रातून ५० वी मेरीट आली आहे. दरवर्षी महाराष्ट्र

Read more

बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध स्पर्धांमध्ये सुयश  

जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेतील विदयार्थ्यांनी विविध आंतरशालेय स्पर्धांमध्ये सुयश प्राप्त केले आहे. खंडेलवाल इंग्लिश स्कुल तर्फे आयोजित ‘Science Meet 2023’ मध्ये विविध स्पर्धांमध्ये बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात Science Quiz या स्पर्धेमध्ये एकूण २८ शाळा व ७५ गट सहभागी झाले होते. त्यामध्ये  वर्ग ४ च्या श्रीयश विनायक पाठक आणि अर्णव विजय धोत्रे यांच्या गटाने उत्कृष्ट सादरीकरण करत व्दितीय क्रमांक मिळविला. त्यांना प्रशस्तिपत्रक,

Read more

बाल शिवाजी माध्यमिक शाळेची आर्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम 

तुळसाबाई कावल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातूर येथे स्व.सरलाबाई गहिलोत यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेत “Should Social Media be banned or not under 18 ”  या विषयाच्या बाजूने आपले मत ठामपणे मांडत कु. आर्या दत्तात्रय कराळे वर्ग ९ च्या विद्यार्थिनीने  सर्वोकृष्ट वक्तृत्व करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक  पटकाविले. प्रमाणपत्र,रोख पारितोषिक,स्मृतिचिन्ह देऊन तिला गौरविण्यात आले. तसेच शाळेला फिरती ढाल देऊन सन्मानित करण्यात आले.  आर्याने मिळविलेल्या यशाबद्दल

Read more

डॉ.  होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांचे  सुयश 

 मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा वर्ग ६ व ९ साठी घेण्यात येते. ही परीक्षा लेखी, प्रात्यक्षिक व प्रकल्प सादरीकरण अशा तीन स्तरावर घेण्यात येते.  डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक  स्पर्धा २०२२-२३ मध्ये बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन केले आहे. या स्पर्धेच्या  प्रात्यक्षिक परीक्षेच्या दुसऱ्या फेरीसाठी वर्ग ६ वी ची राजस्वी नारायण शेगोकार, आदिनाथ श्रीप्रसाद पुसेगांवकर तसेच वर्ग ९ ची  संस्कृती

Read more

माझी बाल शाळा व बाल शिवाजी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये उत्तम यश

स्थानिक ब्राह्मण सभा अकोला शिक्षण संकुलांतर्गत माझी बाल शाळा व बाल शिवाजी प्राथमिक शाळेतील  विद्यार्थ्यांनी समर्थ पब्लिक स्कूल येथे आयोजित किड्स फेस्टिवल मध्ये विविध स्पर्धांमध्ये उत्तम यश संपादन केले आहे. वय 3 ते 5 व 6 ते 8 अशा दोन गटात श्लोक पाठांतर, फॅन्सी ड्रेस, चित्र रंगवणे अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.  त्यात श्लोक पाठांतरस्पर्धेत वय 3 ते 5 या गटातून  प्रथम क्रमांक- आरोही लखन गायकवाड –  केजी -1

Read more

बाल शिवाजी शाळेत वक्तृत्व स्पर्धा संपन्न

स्थानिक जठारपेठ येथील बाल शिवाजी प्राथमिक शाळेत शाळेचे संस्थापक स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतीदिनानिमित्य वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्व. अण्णासाहेब देव यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. १ फेब्रुवारीला घेण्यात आलेल्या वर्गवार वक्तृत्व स्पर्धेची प्रथम  वर्ग ५ चे ईश्वरी किशोर तायडे, आदिती अजय देशमुख, समृद्धी मनिष मगर, वर्ग ६ चे  अभिनव निलेश सोनी, वरद राजेश कवडे,  आनंदी सुनील म्हैसने  व वर्ग ७ चे   रेवा नितीन मुळे,

Read more

बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश

सरस्वती शिशु मंदिर  व खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळेतर्फे आंतरशालेय संस्कृत स्तोत्र पठन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या संस्कृत पाठांतर स्पर्धेत पूर्व प्राथमिक गटातून निहीर जितेंद्र जोशी  (KG २ – प्रथम क्रमांक), आदिनाथ सारंग सोमण  (KG १ – व्दितीय क्रमांक ) या विद्यार्थ्यांनी  प्रशस्तिपत्रक व रोख पारितोषिक मिळविले. प्राथमिक  गटातून  वरदा विक्रांत कुळकर्णी   वर्ग ३ रा हिने व्दितीय क्रमांकाचे  पारितोषिक मिळविले.  पूर्व माध्यमिक गटातून भक्ती किशोर कावरे वर्ग ७ वा हिने प्रथम क्रमांक,  वर्ग ५

Read more

सर सी.व्ही.रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत बाल शिवाजीची संस्कृती पाठक महाराष्ट्रात प्रथम

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी प्राथमिक शाळेची वर्ग सहावीची विद्यार्थिनी कु. संस्कृती विनायक पाठक हिने सी. व्ही. रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून प्रथम स्थान पटकावले आहे. परीक्षेत मिळविलेल्या सुयशाबद्दल तिला बक्षीस स्वरूपात रुपये ५०००/ किंमतीचा टेलिस्कोप मिळाला आहे.  या शिवाय होमी भाभा बाल वैज्ञानिक सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत तिने सिल्व्हर मेडल प्राप्त केले आहे.  तसेच महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (जळगांव), Wisdom Maths and Science Exam, भास्कराचार्य परीक्षा यासारख्या विविध राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा मध्ये

Read more
1 2 3