📰 मनूताई कन्या शाळेतील आंतरशालेय कथाकथन व निबंध स्पर्धेत बाल शिवाजी माध्यमिक शाळेचे दैदिप्यमान यश
अकोला : मनूताई कन्या शाळा, अकोला येथे आयोजित आंतरशालेय कथाकथन व निबंध स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या यशस्वी परंपरेत आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर घातली.
या स्पर्धेत कथाकथन स्पर्धेत इयत्ता आठवीची विद्यार्थिनी वरदा विक्रांत कुलकर्णी हिने आपल्या प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर प्रथम क्रमांक पटकावला. तसेच निबंध स्पर्धेत इयत्ता 9 वीचा विद्यार्थी अर्णव रवींद्र भांबेरे याने उत्कृष्ट लेखनकौशल्याचे प्रदर्शन करत प्रथम क्रमांक मिळविला.
विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद व पालकांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या या यशामागे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य आहे.
