🏆 M.T.S. जळगाव राज्यस्तरीय परीक्षेत बाल शिवाजी प्राथमिक शाळेचे घवघवीत यश! 🎉


ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षा (M.T.S.), जळगाव यांच्या राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.
🌟 विशेष यश 🥈 इयत्ता ६ वीचा तन्मय सचिन ताडे – राज्यात द्वितीय क्रमांक 🏅 इयत्ता ७ वीचा अर्णव विजय धोत्रे – राज्यात पाचवा क्रमांक
याशिवाय विविध इयत्तांतील एकूण १९ विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखली.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐👏