संस्कृती जपणुकीचा संदेश देणारा संस्कृतदिन बाल शिवाजी शाळेत उत्साहात संपन्न!

‘संस्कृती धर्म रक्षणाय खलु’ या उक्तीला सार्थ ठरवत भारतीय संस्कृतीतील पावित्र्य, प्रेम व बंधुभाव जपणारा संस्कृत दिन व रक्षाबंधन सोहळा बाल शिवाजी माध्यमिक शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक मा. डॉ. सौ. उत्पला मुळावकर उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर यांनी अतिथींचे स्वागत केले. सौ. किरण पाटील यांनी प्रास्ताविक केले.
🎶 इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी समूहगीताद्वारे संस्कृत भाषा व भारतीय संस्कृती जपण्याचा दृढ संकल्प व्यक्त केला. कृष्णाई राऊत हिने महाकवी कालिदास व पांडुरंग वामन काणे यांच्या संस्कृत साहित्य योगदानाची माहिती दिली, तर प्रचिती चोरे हिने द्रौपदी-कृष्ण यांच्या बहिण-भावाच्या स्नेहाचे दर्शन कथेतून घडवले. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थ्यांनी ‘ऋतूकलह’ संस्कृत नाटिका उत्कृष्टपणे सादर केली.
🏆 संस्कृत दिनानिमित्त झालेल्या स्पर्धांतील विजेत्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला.
इयत्ता १ व २ – ‘सिद्धमंगल स्तोत्र पठण’ (अ गट)
🥇 राघव सखाराम पार्डीकर
🥈 श्रीवत्स श्रीकांत कुलकर्णी
इयत्ता ३ व ४ – ‘श्री सूक्त पठण’ (ब गट)
🥇 शांभवी शैलेश कुलकर्णी व अमृता सचिन कराळे
🥈 चिरंतनी चंद्रकांत चव्हाण
इयत्ता ५ व ६ – ‘स्मरणशक्ती स्पर्धा’ (क गट)
🥇 अनन्या रामकृष्ण निनाळे
🥈 ईश्वरी अविनाश काटोके
इयत्ता ७ – ‘कथाकथन स्पर्धा’ (ड गट)
🥇 यशस्वी सचिन तायडे
🥈 अनन्या माधव मुरूमकर
💬 डॉ. सौ. उत्पला मुळावकर यांनी संस्कृत ही भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा असून विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक व सुभाषितांचे पठण व मनन करावे. संस्कृतमुळे मेंदू तल्लख होतो व उच्चार स्पष्ट होतात, त्यामुळे प्रत्येकाने संस्कृतशी नाते जोडावे, असे आवाहन केले.
सौ. अपर्णा बोराखडे यांनी अतिथींचा परिचय करून दिला, तर सौ. ज्योती कोकाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप एकात्मता मंत्राने करण्यात आला. त्यानंतर वर्गनिहाय रक्षाबंधन सोहळा पार पडला.
यावेळी ब्राह्मण सभेचे सचिव श्री. मोहन गद्रे, शाळासमिती सदस्य डॉ. राजेंद्र मेंडकी, माध्यमिक मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, सर्व शिक्षिका, कर्मचारीवृंद व पालक उपस्थित होते.