विस्डम एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या गणित – विज्ञान स्पर्धा परीक्षेत बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय यश…

विस्डम एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पुणे तर्फे फेब्रुवारी 2025 -26 मध्ये घेण्यात आलेल्या गणित व विज्ञान स्पर्धा परीक्षेत बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे 16 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे.

गणित विषयात नील अनिल लव्हाळे वर्ग 3 रा (राज्यातून 43 वा) स्वरा सुधीर चव्हाण वर्ग 5 वा (राज्यातून 2 री) पार्थ विक्रम घाईट वर्ग 5 वा (राज्यातून 2 रा) तन्मय सचिन ताडे वर्ग 6 वा (राज्यातून 1 ला) वसुंधरा प्रकाश रेवस्कर वर्ग 8 वा (राज्यातून 18 वी) वरद संजय राऊत वर्ग 6 वा (राज्यातून 28 वा)

तसेच विज्ञान विषयात राजवीर मंजीत भदे वर्ग 3 रा (राज्यातून 43 वा) स्वरा सुधीर चव्हाण वर्ग 5 वा (राज्यातून 34 वी) पार्थ विक्रम घाईट वर्ग 5 वा (राज्यातून 14 वा) वरद पियुष गंगाखेडकर वर्ग 5 वा (राज्यातून 49 वा) स्वरा प्रफुल्ल भालतिलक वर्ग 7 वा (राज्यातून 22 वी) आराध्या सुशील इंगळे वर्ग 7 वा (राज्यातून 43 वी) तन्मय सचिन ताडे वर्ग 6 वा, (राज्यातून 13 वा) अर्णव रवींद्र भांबेरे वर्ग 8 वा (राज्यातून 9 वा) श्रीयश विनायक पाठक वर्ग 7 वा (राज्यातून 15 वा) वसुंधरा प्रकाश रेवस्कर वर्ग 8 वा (राज्यातून 36 वी) यांचा समावेश आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व मार्गदर्शक शिक्षिका यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. अविनाश देव, उपाध्यक्ष श्री नरेंद्र पाठक. सचिव श्री. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव, व सौ. वैजयंती पाठक, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता जळमकर, तसेच बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे, शिक्षकवृंद व कर्मचारीवर्ग यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.