बाल शिवाजी शाळेत सखी सावित्री समितीचे पुनर्गठन व समुपदेशन कार्यशाळा उत्साहात!

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथे सखी सावित्री समितीचे पुनर्गठन तसेच विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमात समितीच्या नवनियुक्त सदस्यांची ओळख करून देण्यात आली. समितीच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती सदस्या सौ. वैशाली देशपांडे उपस्थित होत्या. सहसचिव म्हणून माध्यमिक मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे उपस्थित होत्या.
👩‍⚕️ समिती सदस्य म्हणून समुपदेशक डॉ. राधिका केळकर, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. स्नेहल काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती वीणा भालतिलक, महिला पालक प्रतिनिधी सौ. कल्पना निखाडे व सौ. मीना काळे, शाळा समिती सदस्या सौ. भक्ती बिडवई व डॉ. सौ. कल्याणी बेलोरकर यांची ओळख करून देण्यात आली.
💡 डॉ. राधिका केळकर यांनी विचार-भावना-वर्तन यांचा परस्पर संबंध, मोबाईलचा दुरुपयोग व उपाय, ध्येय निर्धारण आणि आत्मविश्वास याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व्हिडिओ पाहावेत, असेही त्यांनी सांगितले.
👮‍♀️ सहाय्यक पोलीस निरीक्षक वीणा भालतिलक यांनी सोशल मीडियाचा गैरवापर, स्व-सुरक्षितता तसेच गुड टच–बॅड टच याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
🌱 विद्यार्थ्यांना सुरक्षित, आत्मविश्वासपूर्ण व सुदृढ वातावरण मिळावे आणि त्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली सखी सावित्री समितीची सभा व समुपदेशन कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाली.