बाल शिवाजी प्राथमिक शाळेत क्रांती दिन उत्साहात साजरा…!

ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळेत क्रांती दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत स्वातंत्र्यसैनिकांच्या शौर्याला आणि त्यागाला अभिवादन केले.
🎭 वर्ग १ ते ६ – क्रांतिकारक वेशभूषा स्पर्धा
वर्ग १ ते ६ मधील विद्यार्थ्यांनी विविध स्वातंत्र्यसैनिकांच्या वेशभूषा साकारत त्यांच्या कार्याची माहिती तसेच घोषवाक्ये सादर केली.
🏆 वर्ग १ 🥇 ओजस अंकुश गावंडे – प्रथम
🥈 गिरीजा शंतनू निबंधे – द्वितीय
🌟 माही गणेश लांडे – उत्तेजनार्थ
🏆 वर्ग २ 🥇 श्रीमयी अमित चरपे – प्रथम
🥈 श्लोक अमित मते – द्वितीय
🌟 उत्कर्ष केशव उंबरकार – उत्तेजनार्थ
🏆 वर्ग ३ व ४ 🥇 नील अनिल लव्हाळे – प्रथम
🥈 आदिनाथ सारंग सोमण – द्वितीय
🌟 परिधी प्रफुल्ल काळणे – उत्तेजनार्थ
🏆 वर्ग ५ व ६ 🥇 ओम प्रविण उजाडे – प्रथम
🥈 आरुषी विठ्ठल गोमासे – द्वितीय
🌟 गार्गी निखिल भाले – उत्तेजनार्थ
🧩 वर्ग ७ – ‘क्रांतिकारक’ शब्दकोडे स्पर्धा
🥇 अधिश्री शरद इंगळे – प्रथम
🥈 आदित्य संदीप डोंगरे – द्वितीय
🌟 अन्वया निलेश पाकदुने – उत्तेजनार्थ
✍️ वर्ग ८ – निबंध स्पर्धा
विषय – “मी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालो असतो तर…”
🥇 समृद्धी सुधीर भगत – प्रथम
🥈 युगंधर प्रसाद शेवलकर – द्वितीय
🌟 उपेंद्र माधव कुलकर्णी – उत्तेजनार्थ
या प्रसंगी शाळेच्या कार्यकारिणी सदस्या सौ. वैजयंती पाठक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्वातंत्र्यसैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या त्यागाची माहिती देत त्यांनी विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याचे महत्त्व जाणून देशप्रेम, शिस्त, एकता आणि जबाबदार नागरिकत्वाची भावना अंगीकारावी, असे आवाहन केले.
या विविध स्पर्धांचे परीक्षण सौ. भारती कुलकर्णी, श्रीमती मानसी मानकर, सौ. साक्षी सहस्त्रबुद्धे व सौ. धनश्री रेलकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या शेवटी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे क्रांती दिनाचा कार्यक्रम आनंददायी, उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
” क्रांतीची ज्योत मनामनात तेवत ठेवूया… देशभक्तीची भावना अधिक दृढ करूया” !