बाल शिवाजी शाळेतील विद्यार्थ्यांचे सुयश
Wisdom Education Foundation, Pune तर्फे दरवर्षी वर्ग ३ री ते ८ वी साठी Science आणि Maths या विषयांच्या स्पर्धा परीक्षा घेण्यात येतात. यावर्षी या स्पर्धा परीक्षा Online घेण्यात आल्या.
त्यामध्ये वर्ग ७ वी ची संस्कृती विनायक पाठक हिने Science Wisdom या परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळविले आहे. Maths Wisdom या परीक्षेत संस्कृतीने राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत आठवे स्थान मिळविले आहे. वर्ग ६ वी ची समृद्धी हरिश्चंद्र काळंके हिने Science Wisdom या परीक्षेत राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत प्रथम स्थान मिळविले आहे.
त्याचप्रमाणे वर्ग ४ थी ची राजस्वी नारायण शेगोकार हिने Maths Wisdom या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत चौथे स्थान मिळविले आहे. वर्ग ३ री ची तनुश्री धनंजय चव्हाण हिने सुद्धा Maths Wisdom या परीक्षेत उत्तम गुण प्राप्त करून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत झळकली आहे.Covid -19 च्या विपरीत परिस्थितीही विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शाळेतील विषय शिक्षिकांचे मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना हे यश प्राप्त झाले आहे.
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई देव, बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.