महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेत बाल शिवाजी शाळेचे सुयश

स्थानिक जठारपेठ येथील बाल शिवाजी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेत घवघवीत यश संपादित केले आहे.  वाडिया कॉलेज ,पुणे यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा सत्र २०१९-२० मध्ये वर्ग ८ वी तील जिल्हा स्तरीय गुणवत्ता यादीत  मधुरा प्रदीप किडीले हिने प्रथम स्थान, स्वरांजली शिरीष कडू हिने दुसरे, ओजस श्रीकांत जोशी याने तिसरे  तर क्षितिजा पंकज देशमुख हिने चौथे स्थान पटकाविले आहे. तर श्रीनिधी संदीप पाटील, मंथन देवानंद मोरे, विनित संजय सदांशीव, व्यंकटेश संजय चोपडे, कौस्तुभ संतोष शेकोकार, भूमिका दिनेश भटकर, राधा रविंद्र पागृत, नियती अविनाश वासनिक या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. जिल्हा स्तरीय गुणवत्ता यादीत पहिले चारही विद्यार्थी बाल शिवाजी शाळेचे आहेत. तसेच वर्ग ९ वी  तील साक्षी नरेंद्र कराळे  हिने  जिल्हा स्तरीय गुणवत्ता यादीत पहिले  तर नमस्वी  नारायण शेकोकार हिने ४ चौथे स्थान पटकाविले आहे.तर  इशानी  उमेश लाहोटे, शर्वरी विनायक जामकर, श्रीहरी मुकुंद देशपांडे, समृद्धी श्रीकांत डांगे, मानसी महेश डाबरे, अथर्व संजय कपले, ऋचा अनंत देशपांडे, श्रेया विनोद काळपांडे, समृद्धी अतुल चौधरी, नम्रता नंदूसिंग मेहेर, धनश्री धनंजय धोत्रे, वैष्णवी किशोर इंगळे, मेघा महेंद्र कोलटक्के, अर्पित रविंद्र भांडे  या  विद्यार्थ्यांना  उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे.  वर्ग १० वी मधून समृद्धी ज्ञानेश्वर खडसे, सोहम रविंद्र देशमुख, ख़ुशी नितीन मोहोड, वेदश्री अतुल डिक्कर, ओजस्वी अविनाश बोर्डे  या  विद्यार्थ्यांना  उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. कोरोना महामारीच्या परिस्थितीही विद्यार्थ्यांनी आपल्या प्रगतीचा आलेख कायमच ठेवला आहे.      

सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री.विश्वनाथ गद्रे,कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव,ब्राह्मण सभा कार्यकारिणी सदस्य, सर्व शाळा समिती सदस्य, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे  व शाळेतील सर्व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.