राष्ट्रीय गणित दिन उत्साहात साजरा

स्थानिक जठारपेठ स्थित बाल शिवाजी शाळेत 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. थोर भारतीय गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या गणिताच्या क्षेत्रातील अनमोल योगदानाचे स्मरण करण्यासाठी 22 डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

यानिमित्ताने गणिताचे जीवनातील महत्त्व समजणे व गणिताविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड व कुतूहल निर्माण होण्यासाठी शाळेत विविध उपक्रम घेण्यात आले.

त्यामध्ये वर्ग 1 ली ते 2 री च्या विद्यार्थ्यांसाठी गणितीय खेळ घेण्यात आले त्या खेळांचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. वर्ग 3 री व वर्ग 6 वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणितीय खेळणी वर्ग 5 वी साठी चित्रकला स्पर्धा वर्ग 7 वी साठी गणितीय तक्ता सादरीकरण  वर्ग 9 वी साठी गणिताच्या प्रतिकृती तसेच वर्ग 4 थी व 10 वी साठी गणितीय प्रश्नमंजुषा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

वर्ग-वर्गात शिक्षकांनी थोर भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे गणितातील योगदानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले 23 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांना  मुख्याध्यापिकांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे सचिव माननीय श्री मोहन गद्रे सर यांनी  माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ संगीता जळमकर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे टीचर तसेच सर्व शिक्षिका व कर्मचारी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.