बाल शिवाजी शाळेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न
स्थानिक जठारपेठ येथील ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन Covid -19 च्या प्रतिबंधक नियमांचे पालन करीत उत्साहात संपन्न झाला. माध्यमिक शालान्त परीक्षेत शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त करणारी कु ऋचा अनंत देशपांडे हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी ऋचाने आपले मनोगत व्यक्त करताना शाळेप्रती कृतज्ञता करत आम्ही आमच्या मातृभूमीला यशोशिखरावर नेण्याकरिता सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही दिली. देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी संस्थेचे कार्यकारिणी सदस्य श्री. नरेंद्र देशपांडे यांनी ‘ जीवन जगत असताना एक चांगला माणूस म्हणून ओळखले जाणे महत्त्वाचे आहे.’ असा संदेश सर्वांना दिला.
सत्र २०२०-२१ राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेतील राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली नमस्वी नारायण शेगोकार, साक्षी नरेंद्र कराळे, सत्र २०२०-२१ माध्यमिक शालान्त परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी ऋचा अनंत देशपांडे, मानसी महेश डाबरे, शर्वरी विनायक जामकर, आदित्य प्रकाश चतरकर, साक्षी नरेंद्र कराळे, समृद्धी श्रीकांत डांगे तसेच २०१९-२०२० या सत्रातील शिष्यवृत्ती परीक्षेतील समृद्धी हरिश्चंद्र काळंके वर्ग ५ वा राज्यातून ९ वी , स्वरांजली शिरीष कडू वर्ग ८ वा राज्यातून १७ वी या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब पाठक, कार्यकारिणी सदस्य सौ. अनघाताई देव, शाळा समिती सदस्य श्री. महेश कोतेगावकर, डॉ. जयंत म्हैसने, सौ. रेणुका भाले, सौ. भक्ती बिडवई, प्राथामिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.कीर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर व शाळेतील सर्व शिक्षिका, पालकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम ने झाली. तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वर्ग ७ वी च्या प्रणाली गावंडे, राजवीर तारापूरे, तन्वी अरबाळ, आत्मजा राऊत, भक्ती कावरे या विद्यार्थ्यांनी क्रांतिकारकांची माहिती, झेंडा गीत यांचा उत्कृष्ट असा video तयार केला व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठविण्यात आला.