बाल शिवाजीच्या बाल वैज्ञानिकांची यशोभरारी
सुमारे 38 वर्षांपासून इयत्ता 6 वी व 9 च्या विद्यार्थ्यांसाठी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत महाराष्ट्रसह विविध राज्यातून पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होतात. ही स्पर्धा लेखी प्रात्यक्षिक पर्यावरण जतन व संवर्धनांवर आधारित कृती संशोधन प्रकल्प व मुलाखत अशा चार टप्प्यात घेतली जाते. या स्पर्धेतील चारही टप्पे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कस लावणारे असतात. यातील पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट सादरीकरण करत बाल शिवाजी शाळेतील वर्ग 6 वीच्या अकरा विद्यार्थ्यांनी व वर्ग 9 वीच्या 11 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. त्यामध्ये वर्ग 6 वीचे- महेश किशोर इंगळे, ओजस्वी अविनाश काठोले, आराध्या सुशील इंगळे, अर्णव विजय धोत्रे, आनंदी दीपक मानकर, नील सागर ठाकरे, समृद्धी सुधीर भगत, स्वरा प्रफुल्ल भालतिलक, कौस्तुभ हरिश्चंद्र काळंके वरदा विक्रांत कुलकर्णी तसेच श्रीयश विनायक पाठक. व वर्ग 9 वीचे 11 विद्यार्थी श्रीप्रसाद पंकज देशमुख, सुहानी रामकृष्ण निनाळे, आयुष धीरज भिसे, शौर्य राजीवकुमार मोकळकर, धनश्री धनंजय चव्हाण, रेवती प्रवीण कुकडे, आनंदी योगेश सरप, सोनाक्षी मधुकर दावेदार, अदिती शंकर पाटील, आनंदी सुनील म्हैसने, आयुष गजानन जळमकर या विद्यार्थ्यांनी आपला दृढनिश्चय, सातत्य, मेहनत, चिकाटी या गुणांच्या जोरावर तसेच शाळेतील विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाने, हे यश प्राप्त केले आहे.
या उत्तुंग यशाबद्ल संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव सर, सचिव श्री. मोहन गद्रे सर, शाळा समिती सदस्य सौ. अनघाताई देव, त्याचप्रमाणे माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर मॅडम, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कीर्ती चोपडे मॅडम तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.