डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये बाल शिवाजी शाळेच्या संस्कृतीचे सुयश

मुंबई विज्ञान अध्यापक मंडळातर्फे दरवर्षी डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा वर्ग ६ व ९ साठी घेण्यात येते. सत्र २०१९-२० डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेमध्ये बाल शिवाजी शाळेचे विद्यार्थी यशस्वी झाले. त्यामध्ये दुसऱ्या फेरीसाठी वर्ग ६ वी चे कु. संस्कृती विनायक पाठक, मृदुला अविनाश देशमूख, रुतुजा रमण घोगरे, युवराज आनंद गोदे, सक्षम श्रीहरी बेदरकर, राघवेंद्र शिवाजीराव देशमूख यांची तसेच वर्ग ९ चे अथर्व संजय कपले, साक्षी नरेंद्र कराळे, इशानी उमेश लाहोटे, आदित्य प्रकाश चतरकर  या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे.  या सर्व  विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.अविनाश देव, संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई  देव, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे व सौ. भारती कुळकर्णी, शिक्षक वृंद  व कर्मचारी यांनी कौतुक केले आहे. या स्पर्धेमध्ये तिसऱ्या फेरीसाठी संस्कृती विनायक पाठक हिची निवड झाली आहे. संस्कृतीला पुढील फेरीकरीता मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.