शिवजयंती उत्साहात साजरी
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जयंती यांची बाल शिवाजी शाळेत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तसेच सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ. अभय पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपतींच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘ छत्रपती शिवाजी राजे मराठी अस्मितेचे रक्षक ‘ या विषयावर विधी झामरे आणि राघवेंद्र देशमुख याने आपले विचार मांडले. शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती इंग्रजी भाषेतून अदिती तराळे हिने सांगितली. ‘ वेडात मराठे वीर दौडले ‘ ही गोष्ट आर्या कराळे हिने सांगितली. छत्रपती संभाजी महाराजांचे स्वगत श्रीहरी राऊत याने सादर केले. वर्ग ६ वी च्या विद्यार्थ्यांनी
‘ म्यानातून उसळे तलवारीची पात ‘हे समूहगीत सादर केले. याप्रसंगी डॉ. अभय पाटील यांनी ‘ विद्यार्थ्यांनी ज्ञानाने
परिपूर्ण होऊन शिवाजी महाराजांप्रमाणे चारित्र्य संपन्न, संवेदनशील झाल्यास देशाची प्रगती निश्चितच होईल ‘. असे सांगितले.
या कार्यक्रमाला संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई देव, शाळा समिती सदस्य श्री. विजय झापे, श्री. नरेन निखाडे, श्री. समीर थोडगे, सौ रेणुका भाले तसेच प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व सौ. भारती कुळकर्णी, शिक्षक वृंद व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अनन्या महल्ले हिने केले तसेच प्रास्ताविक शिक्षिका समिधा देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.