आजी आजोबा मेळावा उत्साहात संपन्न

बाल शिवाजी शाळेच्या प्रांगणात  आजी आजोबा मेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्रीवल्लभजी निकते व डॉ. सौ. आशा निकते हे लाभले. सरस्वती पुजन व दीपप्रज्ज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात  करण्यात आली. यानंतर देवश्री दत्तात्रय कराळे हिने सूर्यकवच स्तोत्र सादर केले. तर आरोही राहुल महाशब्दे हिने सूर्यस्तोत्रम सादर केले. वर्ग ४ च्या विद्यार्थ्यांनी अफजलखानाचा वध हा पोवाडा सादर केला.
मेळाव्यात सर्वप्रथम आजी आजोंबांसाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्मरणशक्ती स्पर्धेत श्री. बाबुराव लक्ष्मणराव पटके आणि श्री. पुंडलिक शंकर गव्हाळे या आजोबांना आणि सौ. विद्या भालोदकर आजी यांनी बक्षिस मिळवले. तसेच टिपरीत बांगड्या टाकणे या स्पर्धेत सौ. गुणमाला झडपे, टुथपिकने नाणे उचलणे या स्पर्धेत श्री. नेमिदास महाजन, बास्केट बॉल या कपल साठीच्या स्पर्धेत श्री. गजानन कोंडोलीकर व सौ. उषा  कोंडोलीकर  या जोडीने, संगीत खूर्ची या स्पर्धेत श्री. राजेंद्र श्रीराम भाकरे व सौ. मंगला निरंजन देवलसी या आजी आजोबांना बक्षिसे मिळालीत. सर्व विजयी स्पर्धकांना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
यानंतर प्रश्नावलीचे उत्तम लेखन करण्याऱ्या सौ. विणा गिरीश भाले आणि सौ. विजया विजयराव देशमुख याना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. श्री. तुकाराम राजाराम गोमासे आजोबा व सौ. सुरेखा सुरेश महाशब्दे  आजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माझी बाल शाळेच्या प्रमुख भावना उपासने यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. सौ. आशा निकते मॅडम यांनी उपस्थित आजी- आजोबांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी ? आपले आरोग्य कसे निरोगी ठेवावे  ? याबद्दल मार्गदर्शन केले आणि डॉ. श्री. वल्लभ निकते सर यांनी ‘financial Investment ‘ कशी करावी यासंबंधी मार्गदर्शन केले. या मेळाव्यास  संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव,  संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, संस्थेच्या कार्यकारिणी सदस्य सौ.अनघाताई  देव, शाळा समिती सदस्य सौ.  रेणुका भाले तसेच बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्ती चोपडे व  सौ. भारती कुळकर्णी, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, शिक्षक वृंद, कर्मचारी सर्व आजी- आजोबा उपस्थित होते. कार्यक्रमानंतर आजी- आजोबांना अल्पोपहार देण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रश्मी अग्रवाल यांनी केले.