बाल शिवाजी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी
स्थानिक जठारपेठेतील बाल शिवाजी शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शाळेचे अध्यक्ष अविनाश देव व प्रमुख पाहुणे प्रा. गजानन मालोकार सर हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिवरायांच्या पराक्रमाच्या अज्ञात कथा सिद्धी झामरे व भूमिका भटकर यांनी सादर केल्या.
शिवाजी महाराजांचे सहकारी शूर योद्धा बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा इंग्रजीतून अनुष्का चतारे हिने सादर केली. शिवाजी महाराज मोहिमेवर जाताना योजनाबद्ध आखणी करत असत याविषयीचा एक प्रसंग ओजस जोशी यांनी सांगितला. राजमाता जिजाऊनी शिवबांवर केलेले संस्कार व त्यांना दिलेली शिकवण आपल्या भाषणातून राधा वाम्बूरकर हिने सांगितले. तर स्वरचित कविता राधा पागृत हिने सादर केली.
यानंतर वर्ग ६ वी च्या विद्यार्थ्यांनी ‘दैवत माझे ……’ हे समूहगीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. प्रा. गजानन मालोकार यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा थोडक्यात परिचय करून दिला. प्रत्येक विद्यार्थ्यांने शिवाजी महाराजांच्याप्रमाणे आपले ध्येय निश्चित करून वाटचाल करावी असे त्यांनी आपल्या भाषणातून सांगितले. यावेळी शाळेत रँकिंग चेस टुर्नामेंट मध्ये विजयी खेळाडूंना पारितोषिके प्रदान करण्यात आली. ही स्पर्धा रविवार दि ११ फेब्रुवारी २०१८ रोजी आयोजीत करण्यात आली होती .
ही स्पर्धा स्व. अण्णासाहेब देव यांच्या स्मृतीप्रित्यर्थ घेण् यात येते. ही स्पर्धा वर्ग १ ते ५ व वर्ग ६ ते १० अशा दोन गटात घेण्यात येते. या स्पर्धेत ‘अ’ गटातून – देवांशी गावंडे प्रथम, साहिल कुळकर्णी व्दितीय, आरुषी अग्रवाल तृतीय ‘ब ‘ गटातून आयुषी भाटीया प्रथम, सारंग जाजू व्दितीय, मानसी शिरसाट तृतीय आलेत. सर्व विजयी स्पर्धकांना मान्यवरांचा हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आलीत . शाळेचे अध्यक्ष अविनाश देव यांनी प्रमुख पाहुणे गजानन मालोकार सर यांना भेटवस्तू प्रदान केली.
कार्यक्रमाला शाळेचे सचिव मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्या सौ. अनघा देव तसेच शाळा समिती सद्यस्य, मुख्याध्यापिका सौ.संगीता जळमकर, सौ.कीर्ती चोपडे, सौ.भारती कुळकर्णी तसेच सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन भक्ती भालेराव हिने केले तर प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सौ. वैशाली पाटील यांनी केले. कार्यक्रमाची सांगता एकात्मता मंत्राने झाली.