🎨🌟 युवा मास्टर स्ट्रोक आयोजित चित्रकला स्पर्धेत बाल शिवाजी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश! 🌟🎨
अकोला : युवा मास्टर स्ट्रोक यांच्या वतीने आयोजित चित्रकला स्पर्धेत ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी प्राथमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेमध्ये इयत्ता 4 थीची विद्यार्थिनी कु. अपेक्षा सुनील म्हैसने हिने ब गटातून प्रथम क्रमांक प्राप्त केला. तसेच इयत्ता 6 वीची विद्यार्थिनी कु. तनुश्री नागोराव गव्हाळे हिने क गटातून प्रथम क्रमांक पटकावून आपल्या कलागुणांची चमक दाखवली.
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, सचिव प्रा. मोहन गद्रे, कार्यकारिणी सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे, चित्रकला शिक्षिका राधा कात्रे
तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
🌸🎨 अभिनंदन! अपेक्षा आणि तनुश्री! 🎨🌸
तुमच्या कलागुणांना अशीच नवी भरारी मिळो आणि यशाची नवनवी शिखरे गाठता यावीत, हीच सदिच्छा! 💐✨
