बाल शिवाजी शाळेत 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा….
ब्राह्मण सभा शिक्षण संकुलांतर्गत बाल शिवाजी शाळेत स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला.
माध्यमिक शालांत परीक्षा २०२६-२७ मध्ये प्रथम क्रमांक पटकावलेल्या चि.युगंधर निलेश पाकदुने व चि. अभिनव निलेश सोनी ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे सहसचिव श्री. नरेंद्र देशपांडे यांनी “धनाच्या बळावर, तलवारीच्या धारेवर स्वातंत्र्य मिळवता येत नाही आणि देशाचे भविष्यही उज्वल घडू शकत नाही तर केवळ देशाची युवा पिढीच देशाचे भविष्य उज्वल घडवू शकते आणि स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकते” हा संदेश दिला.
विद्यार्थ्यांनी राज्यगीत, जयोस्तुते देशभक्तिपर गीतांचे सादरीकरण करून वातावरण भारावून टाकले.
वर्ग 7 वीच्या विद्यार्थ्यांनी “पवित्रतेचा पुण्याईचा आमुचा मंगल देश” हे देशभक्तीपर गीत सादर केले. चि. ओम गावंडे याने थोर सेनानी मथुराबाई लोटलीकर, कु. अन्वया पाकदुने हिने क्रांतिकारक ‘मास्टर दा सूर्यसेन’ तसेच चि.ओजस माडीवाले व कु. ऋग्वेदा उगले यांनी स्वातंत्र्याच्या इतिहासाचे महत्त्व याविषयी माहिती आपल्या भाषणातून दिली. कु. वसुंधरा रेवस्कर हिने महाराष्ट्र टॅलेंट सर्च परीक्षेत राज्यात प्रथम स्थान, वर्ग 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 8 वे स्थान तसेच गणित प्रज्ञाशोध परीक्षेत व विज्ञान विस्डम या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्या बद्दल विशेष कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर शिष्यवृत्ती परीक्षेत वर्ग 8, वर्ग 5, वर्ग 7, वर्ग 4 च्या विद्यार्थ्यांचा तसेच गणित प्रज्ञाशोध परीक्षा, विज्ञान व विज्ञान विस्डम परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. मीना मुरुमकार यांनी तर संचालन कु. तनया निलेश अनासने (वर्ग 7) हिने केले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव श्री. मोहन गद्रे, सहसचिव श्री. नरेंद्र देशपांडे, कार्यकारणी सदस्या सौ. वैशाली देशपांडे, शाळा समिती सदस्य श्री. महेश कोतेगावकर , सौ.भक्ती बिडवाई, मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर आणि श्रीमती. कीर्ती चोपडे, सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, पालकवृंद व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ या गीताने करण्यात आली.
