इंटरस्कूल मीटमध्ये बाल शिवाजी शाळेचे घवघवीत यश…


विज्ञान, गणित व तंत्रज्ञान स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांकावर मोहोर…..

कोठारी कॉन्व्हेंटतर्फे आयोजित ब्रिजलाल बियाणी इंटर स्कूल सायन्स, मॅथ्स अँड टेक्नॉलॉजी मीटमध्ये “ब्राह्मण सभा संचालित बाल शिवाजी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली.
इयत्ता ७ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित या स्पर्धेत Action Research Project Presentation on Best Themes and Practical Tasks या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे प्रभावी सादरीकरण केले. स्पर्धेचे आयोजन Synopsis Submission, File Submission आणि Project Presentation अशा तीन फेऱ्यांमध्ये करण्यात आले होते. बाल शिवाजी शाळेचे एकूण चार चमू या स्पर्धेत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, या चारही चमूंची तिसऱ्या फेरीसाठी निवड झाली.
इयत्ता ८ वीच्या गटात श्रीयश विनायक पाठक व अर्णव विजय धोत्रे यांनी ‘Trash to Cash (Composed Math and Yield Productions) या प्रकल्पाच्या सादरीकरणातून प्रथम क्रमांक पटकावला.
तर इयत्ता १० वीच्या गटात आदिनाथ श्रीपाद पुसेगावकर व नवल सतीश पाथरे यांनी ‘The Carbon Balance (Personal Footprint Math) या विषयावरील प्रकल्प सादर करून द्वितीय क्रमांक मिळविला.
या यशस्वी कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना शिक्षिका सौ. मीना मुरुमकर व सौ. ज्योत्स्ना कानकिरड यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेतील शिक्षिका यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. अविनाश देव, माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता जळमकर व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती चोपडे यांनी अभिनंदन करून सत्कार केला.