बाल शिवाजीच्या सातवीच्या विद्यार्थ्यांची कृषी विद्यापीठात वनौषधींची अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट | नागार्जुन विभाग, अकोला
बाल शिवाजी माध्यमिक शाळा, जठारपेठ, अकोला येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांची डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील नागार्जुन विभागात वनौषधींची पाहणी करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली.
या क्षेत्रभेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध वनौषधींची प्रत्यक्ष पाहणी करून त्यांचे औषधी गुणधर्म, उपयोग, महत्त्व आणि संवर्धन याबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने निरीक्षण करत विविध प्रश्न विचारून विषयाचे ज्ञान आत्मसात केले.
यावेळी मा. प्रा. नितीन पत्की व मा. प्रा. अमित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना वनौषधींचे महत्त्व, उपयोग व संवर्धन याबाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले.
पाठ्यपुस्तकातील ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देणारी ही क्षेत्रभेट विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि अविस्मरणीय ठरली. ![]()
![]()
स्थळ: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला – नागार्जुन विभाग
इयत्ता: सातवी
विषय: वनौषधींची पाहणी व माहिती
